शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला शाळेतून काढले

By admin | Updated: April 9, 2017 02:46 IST

निळजे गावातील रवींद्रनाथ टागोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एका विद्यार्थ्याच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून, त्याला परीक्षेपासून वंचित ठेवून, त्याला शाळेतूनही काढून

डोंबिवली : निळजे गावातील रवींद्रनाथ टागोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एका विद्यार्थ्याच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून, त्याला परीक्षेपासून वंचित ठेवून, त्याला शाळेतूनही काढून टाकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यश श्रीवास्तव असे या विद्यार्थ्याचे नाव असून ‘राइट टू एज्युकेशन’अंतर्गत ज्युनिअर केजीच्या वर्गात त्याला प्रवेश दिला. मात्र, परीक्षेच्या आधी पालकांनी टर्म व मासिक फी भरली नाही, म्हणून मुलाला वर्गात घेतले जात नाही. बाहेर उभे ठेवण्याची शिक्षा शाळेकडून दिली जात आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला समज देऊनही शाळेच्या व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. लोढा हेवनमध्ये राहणाऱ्या अंजली श्रीवास्तव यांचा मुलगा यश याने ‘राइट टू एज्युकेशन’अंतर्गत टागोर शाळेत ज्युनिअर केजीसाठी प्रवेश घेतला. ३ एप्रिलपासून परीक्षा सुरू झाली. मात्र, यशला परीक्षेला बसू दिले जात नाही, त्याला वर्गाबाहेर उभे ठेवले जाते, याची माहिती त्याने पालकांना दिली. पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेने सांगितले की, तुमच्याकडे टर्म व महिना फी मागितली होती. ती तुम्ही भरलेले नाही. त्यामुळे तुमच्या पाल्याला परीक्षेला बसू दिले जात नाही. हा प्रकार यशच्या पालकांनी डीवायएफआय या संघटनेचे पदाधिकारी संजय गायकवाड व अ‍ॅड. नितीन घुले यांच्याकडे कथन केला. शाळेकडे याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘शाळेकडे ‘राइट टू एज्युकेशन’चा निधीच आलेला नाही. त्यामुळे शाळेचा खर्च कसा भागवायचा? फी भरावी लागेल.’ एवढेच नव्हे तर शाळेने यशला शाळेतून काढून टाकले आहे.’ राइट टू एज्युकेशनचा प्रवेश ज्युनिअर केजी की इयत्ता पहिलीपासून लागू करायचा, हे ठरवण्याचा अधिकार शाळांवर आहे. ज्युनिअर केजीपासून ‘राइट टू एज्युकेशन’चे प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या शाळांची संख्या सहा आहे. तर, इयत्ता पहिलीपासून या प्रकारात प्रवेश देणाऱ्या शाळांचा आकडा ४८ आहे. राइट टू एज्युकेशनमध्ये प्रवेश घेणाऱ्या शाळांकडून फीची मागणी केली जात असल्याने गायकवाड व घुले यांनी राइट टू एज्युकेशनचा लाभ न देणाऱ्या शाळांच्या विरोधात उद्या कल्याणमध्ये एक बैठक बोलवली आहे. ज्या पालकांच्या पाल्यांना विविध शाळांमधून हा अधिकार नाकारला गेला आहे, त्यांच्याविरोधात ही बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशालाही दाद नाही- गटशिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांच्याकडे टागोर शाळेचे प्रकरण कथन केले होते. शाळा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाही दाद देत नाही, असे डीवायएफआय या संघटनेचे म्हणणे आहे. - टागोर शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणी ‘मी आता काही बोलू इच्छित नाही. आता मीटिंगमध्ये आहे. नंतर, माहिती सांगतो’, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.