शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची शिवशाही बस : कल्याण-नगर प्रवास आजपासून गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:46 IST

एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे.

- पंकज रोडेकरकल्याण - एसटी प्रशासनाने कल्याण-अहमदनगर मार्गावर मंगळवारपासून वातानुकूलित आणि आरामदायी अशा शिवशाही बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण व नगरहून तासातासाला या बस सुटणार आहेत. या बसचे भाडे ३४८ रुपये असून प्रवाशांना गारेगार प्रवास घडणार आहे.प्रवाशांना आरामदायी बसप्रवास घडावा तसेच खाजगी ट्रॅव्हल्सशी स्पर्धा करण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही बससेवेत आणल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ठाणे ते बोरिवली, ठाणे ते भार्इंदर या स्थानिक मार्गांवर तसेच ठाणे ते कोल्हापूर या लांबच्या मार्गावर या बस धावत आहेत. ठाणे ते बोरिवली मार्गावर आठ शिवशाही बसच्या दिवसभरात ४८ फेºया, तर ठाणे ते भार्इंदर मार्गावर चार बसच्या एकूण २४ फेºया होत्या. तर, ठाणे-कोल्हापूर मार्गावर दोन शिवशाही बस धावत असून त्यांच्या दोन फेºया होतात.त्यापाठोपाठ आता मंगळवारपासून कल्याण-नगर या मार्गावर ही बस सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार, आजपासून दोन्ही बाजूंनी एकूण २० बस चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटीच्या ठाणे उपविभागीय नियंत्रण विभागाने दिली. सध्याच्या उकाड्यात या वातानुकूलित बसमुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळेल, असा दावाही प्रशासनाने केला.सकाळी ७.३० पासून फेºयाच्कल्याणहून नगरला जाण्यासाठी सकाळी ७.३० वाजता पहिली शिवशाही बस सुटणार आहे. तर, शेवटची बस सायंकाळी ५ वाजता सुटणार आहे. तसेच नगरहून कल्याणसाठीही सकाळी ७.३० तसेच सायंकाळी ५ वाजता शेवटची बस सुटेल.च्एसटी प्रशासनाने या प्रवासासाठी आॅनलाइन तिकीट सेवाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्याही आपले तिकीट आरक्षित करता येणार आहे. 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीkalyanकल्याण