शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नौपाड्यात क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:14 IST

किरकोळ कारणावरून नौपाड्यातील विष्णूनगर भागातील दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळून आल्याने दोघांनी एकमेकांना मारहाण केली.

ठाणे : किरकोळ कारणावरून नौपाड्यातील विष्णूनगर भागातील दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळून आल्याने दोघांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांंनी एकमेकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात नुकत्याच तक्रारी दाखल केल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो ठाण्यात चर्चेचा विषय ठरला असून त्यात मराठीविरुद्ध गुजराती असा रंग दिल्याने चीड व्यक्त होत आहे.सुयश सोसायटीतील पैठणकर यांना याच इमारतीत राहणाऱ्या हसमुख यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ११ सप्टेंबरला घडली. लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिल्याने पैठणकर आणि त्यांच्या घरातील सदस्यांना शहा पिता-पुत्राने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी पैठणकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्याचवेळी शहा यांनीही पैठणकर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यावरून अदखलपात्र गुन्हे दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले. दरम्यान, या मारहाणीमुळे पैठणकर आणि त्यांचे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पैठणकर तर सहाव्या मजल्यावर शहा कुटुंब राहते. ११ सप्टेंबरला लिफ्ट येण्यास उशीर झाल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन प्रकरण हाणामारीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.>राहुल यांच्या आईची चप्पल लिफ्टमध्ये अडकल्यामुळे लिफ्टचा दरवाजा चुकून अर्धवट उघडा राहिला. याचाच जाब विचारण्यासाठी गेलेल्या शहा यांनी पैठणकरांना मारहाण केली. त्याआधी पैठणकरांनीही शहा यांच्या नाकावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या दोघांचा वाद एका व्हिडीओमधून सोशल मीडियाद्वारे व्हायरल केला जात आहे. यात नाहक कोणीही कोणाची बदनामी करीत असेल, तर संबंधितांविरुद्धही माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाईल.- अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नौपाडा पोलीस ठाणे