शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या हेतूलाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:20 IST

अभाविपने वेधले लक्ष : शैैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

- जान्हवी मोर्येडोंबिवली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईतील विद्यापीठात जावे लागू नये, यासाठी विद्यापीठाचे कल्याण येथे उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राच्या उद्घाटनानंतरही येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सोय अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे उपकेंद्राच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे.विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ ११ जुलैला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. ‘स्कूल आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस’ या अभ्यास शाखेची सुरुवात येथे केली जाणार आहे. या उपकेंद्रात एम.टेक इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, एम.टेक इन केमिकल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, एम.टेक इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, एम.टेक इन आर्टिफि शिअल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड मशीन लर्निंग, मास्टर इन ओशोनोग्राफी, पीएच.डी. इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, पीएच.डी. इन केमिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा मुंबईलाच धाव घ्यावी लागणार आहे, याकडे विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे. विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. मात्र, तरीही उपकेंद्रातून खरा उद्देश साध्य होणार नाही, यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमात निषेधाच्या घोषणा देत कुलगुरूंसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता.विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची कार्यशीलता वाढवणे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, जेणेकरून ठाणे-पालघर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईत वारंवार जावे लागणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.महाविद्यालयात तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाइनची सुविधा व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१५ मध्ये सुचवलेली ‘चॉइस बेस क्रेडिट सिस्टीम’ परिणामकारकरीत्या विद्यापीठात लागू करावी, यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अभाविपचे डोंबिवलीतील कार्यकर्ते मिहीर देसाई यांनी दिली.लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ - विद्यापीठविद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा पुरविण्याच्या सक्षमीकरणाचे काम विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे, प्रवेश अर्ज उपलब्ध करून देणे हे काम आॅनलाइनद्वारे केले जाते. निकाल महाविद्यालयांना पाठविले जातात. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे काही गरज लागेल ते लवकरात लवकर मिळेल असे पाहू. ठाण्यात ही सेवा उपलब्ध आहे. कल्याणला ही लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ, अशी माहिती उपकुलसचिव व विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड यांनी दिली.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ