शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्कायवॉकवर राहणार कडक पहारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 23:29 IST

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला लागणार लगाम; पथकांना प्रत्येकी आठ तासांची ड्युटी

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फेरीवाला अतिक्रमणप्रकरणी दोन प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे केल्याने फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथके धास्तावली आहेत. सकाळी आठ ते रात्री ११ या कालावधीत दोन शिफ्टमध्ये फे रीवाला मनाई क्षेत्रात कर्मचारी तैनात राहणार आहेत. यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून सकाळच्या सत्रातील कर्मचाऱ्यांनी दुपारच्या सत्रातील कर्मचारी कामावर हजर झाल्याशिवाय तेथून निघायचे नाही, अशीही तंबी देण्यात आली आहे.आयुक्त सूर्यवंशी यांनी बुधवारी केलेल्या दौºयात रेल्वे स्थानकालगतच्या महापालिकेच्या कल्याण-डोंबिवलीतील दोन्ही स्कायवॉकवर फेरीवाले बसलेले दिसले. यानंतर आयुक्तांनी ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांना निलंबित केले आहे. तर ‘फ’ प्रभागातील फेरीवाला पथकातील कर्मचारी गणेश माने याच्यावरही कारवाई केली आहे.फेरीवाला मनाई क्षेत्रात यापुढे एकही फेरीवाला बसणार नाही, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाºयांना दिली आहे. आयुक्तांच्या दणक्यानंतर प्रभाग अधिकाºयांसह पथकातील कर्मचारी चांगलेच कामाला लागले आहेत. सकाळी आठ ते दुपारी चार आणि दुपारी तीन ते रात्री ११ अशी दोन शिफ्टमध्ये ड्युटी पथकातील कर्मचाºयांना लागली आहे. त्यांच्याबरोबर बंदोबस्तावरील पोलिसांनाही ड्युटी लागली आहे.सहायक आयुक्तच हवेत, मात्र नियम बसवला जातोय धाब्यावरप्रभाग अधिकारी हा सहायक आयुक्तच असावा असा नियम आहे. हा नियमच धाब्यावर बसवला जात आहे. त्यामुळे फेरीवाला असो अथवा बेकायदा बांधकामावरील कारवाई प्रभावीपणे होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. निलंबन कारवाईनंतर ‘क’ आणि ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारीपद अद्याप रिक्त आहे. सहायक आयुक्तपदावर असलेल्या अधिकाºयाला प्रभाग अधिकारी म्हणून नेमतात का? याकडेही लक्ष लागले आहे. तसेच, मनुष्यबळाअभावी पथकांची दमछाक होत आहे. क आणि फ प्रभागात कर्मचाºयांची कमतरता आहे. पथकामध्ये १५ कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच सहा वर्षांपासून कर्मचाºयांच्या बदल्याही झालेल्या नसल्याने अडचणी येत आहेत.