शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

‘ऐका ऐकवते शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील तुमच्या डोळ्यांत पाणी’

By admin | Updated: January 8, 2017 02:39 IST

‘ऐका ऐकवते एका शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील क्षणभर तुमच्या डोळ्यांत पाणी...’ सुभेदारवाडा शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नूपुर गुप्ते हिने कर्जबाजारीपणाला

कल्याण : ‘ऐका ऐकवते एका शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील क्षणभर तुमच्या डोळ्यांत पाणी...’ सुभेदारवाडा शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नूपुर गुप्ते हिने कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱ्या बळीराजाची व्यथा कवितेमधून मांडली आणि उपस्थितांचे मन हेलावले.कल्याणमधील विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विद्यार्थी कविता सादरीकरण स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या. नूपुरची कविता सगळ्यांनाच अंतर्मुख करणारी ठरली. राजश्री माने या विद्यार्थिनीने ‘माझ्या स्वप्नातील भारत’ ही कविता सादर केली. स्वप्नातील भारतात मुली सुरक्षित असतील, तो स्वच्छ असेल, ही कल्पना मांडली होती. सध्या ‘स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाव अभियान’ सुरू आहे. हे अभियान प्रत्यक्षात यावे, ते केवळ स्वप्न ठरू नये, अशी भावना राजश्री हिच्या कवितेतून व्यक्त झाली. पूर्वा या विद्यार्थिनीने ‘तुझ्याविना आई माझी भूक भागायची नाही, पोरके करून गेलीस, खरंच इतकी कच्ची होती का तुझ्यामाझ्यातील नाळ’ ही कविता सादर करून आईविना पोरक्या मुलीच्या खडतर जीवनाचे भावोत्कट वर्णन केले. इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी मेहरूफ शेख या विद्यार्थिनीने ‘शेतावरती जाऊ या, संगतीने गाऊ या’ ही कविता अत्यंत धीटपणे बोलून दाखवली. के.सी. गांधी विद्यालयातील अस्मी जोशी हिने ‘आमच्या गल्लीत आला एक पोपट, करू लागला सारखी वटवट’ ही कविता सादर करून आपली पक्षिनिरीक्षण शक्ती किती दांडगी आहे, याचा प्रत्यय दिला. अस्मी कल्याणच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्राजवळ राहते. त्याठिकाणी पाणी पिण्याकरिता दररोज अनेक पक्षी येतात. त्यांचे निरीक्षण करताना तिला हे काव्य स्फुरले. हर्षवर्धन माने या विद्यार्थ्याने ‘माणूस शेवटी सारंच सोडून जातो’ ही कविता सादर केली, तर सायली सुरोसे या विद्यार्थिनीने ‘पाऊस’ ही कविता सादर केली. ‘माझ्या कवितेला दिले पावसाचे नाव, पानाफुलांना कळाले पावसाचे भाव..’,असे पावसाचे शब्दचित्र रेखाटले होते. अस्मिता जगताप याने ‘शोध’ या कवितेद्वारे ‘माणूस हरवतोय, मागे उरलाय फक्त त्याचा शोध...’या कवितेत शहरीकरणातील माणसाच्या हरवलेपणावर प्रकाश टाकला. सोमनाथ चौरसिया याने विज्ञानवादी विचारांचा संदेश दिला. यावेळी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कथाकथन केले. ‘श्वास’च्या कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. विसूभाऊ बापट यांनी काव्यवाचन सादर केले. (प्रतिनिधी)