शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डेब्रिज प्रकल्पाचे काम थांबवा; महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:27 IST

संपूर्ण खर्च ठेकेदाराकडून वसूल करण्याच्या सूचना

ठाणे : डेब्रिज प्रकल्पाच्या पाहणीत अनेक त्रुटी आढळल्यानंतर यासंदर्भातील अहवाल तयार करण्याच्या सूचना आॅगस्ट महिन्यात महापौरांनी दिल्या होत्या. परंतु, त्याचा अहवाल तयार न झाल्याने आणि या प्रकल्पाचे काम थांबविण्याची मागणी करत, या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेच्या मंगळवारच्या महासभेत लोकप्रतिनिधींनी करीत ते पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. या प्रकल्पात कोणताही भ्रष्टाचार झालाच नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रकल्पाचे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश दिले असून झालेल्या खर्चाची वसुली संबंधित ठेकेदाराकडून करण्याच्या सूचना केल्या आहेत.जुलै महिन्यात डायघर येथील सी अ‍ॅण्ड डी वेस्ट (कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डिमॉलिशन) या प्रकल्पावरून मोठा वादंग झाला होता. त्यानंतर पालिकेच्या काही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. शहरात जमा होणाऱ्या डेब्रिजवर कोणतीही प्रक्रिया ठेकेदार करीत नसताना त्याला कोट्यवधींचे बिल अदा करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. त्यानंतर, महापौरांनी या प्रकल्पाचा पाहणी दौरा केला होता. याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचेही आदेश त्यांनी दिले होते. या प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी नगरसेवकांना दीड तासाचा कालावधी लागला.मात्र, शहरातील डेब्रिज गोळा करून एकच डम्पर दोन तासांत दोन फेºया मारत असल्याच्या आश्चर्यजनक नोंदी या ठिकाणी आढळून आल्या होत्या. परंतु, एवढे करूनही यावर काहीच कारवाई न झाल्याने मंगळवारच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेविका मीनल संख्ये यांनी या प्रकल्पाविरोधात पुन्हा आवाज उठविला.या प्रकल्पाच्या ठिकाणी डेब्रिज न टाकता माती, कचरा टाकला जात असल्याचा आरोप नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. त्यामुळे या ठिकाणी डेब्रिज न टाकण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी लावून धरली. एकूणच या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही यावेळी नगरसेवकांनी केला.भ्रष्टाचार झाला नसल्याचा उपायुक्तांचा दावाया प्रकल्पात कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा उपायुक्त मनीष जोशी यांनी केला. तीन महिने पावसाळा असल्याने या ठिकाणी ठेकेदाराला काम करता आले नाही. आलेले डेब्रिज वाहून जात असल्याचा कयासही त्यांनी यावेळी लावला. परंतु, त्यांच्या या उत्तरांनी समाधान न झाल्याने याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, झालेल्या खर्चाची वसुली करण्यात यावी आणि हा प्रकल्प बंद करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली. अखेर, हा प्रकल्प बंद करण्याच्या सूचना महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिल्या. झालेल्या खर्चाची वसुली ठेकेदाराकडून करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.