शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर रिक्षा डोंबिवलीत महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:29 IST

२ ते १० रुपये वाढ; लवकरच अंमलबजावणी

डोंबिवली : शहरातील सर्वच मार्गांवरील शेअर रिक्षांचा प्रवास पुढील आठवड्यापासून किमान दोन रुपये ते कमाल १० रुपयांपर्यंत वाढणार आहे. जवळच्या अंतराचा प्रवास मात्र महागणार नाही. एकूणच या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.सीएनजी रिक्षांसाठी आरटीओने २०१५ मध्ये मंजूर केलेले दरपत्रक सोमवारपासून ठिकठिकाणी प्रसिद्ध करावे, जेणे करून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद होणार नाहीत, असे संघटना आणि आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये ठरवण्यात आले. तसेच भाडेवाढीनंतर चालकाशेजारी चौथा प्रवासी न घेण्याचेही यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले.पश्चिमेतील सुभाष रोडवरील रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी दोन रुपयांची भाडेवाढ बेकायदा केली होती. या भाडेवाढीवरून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यापार्श्वभूमीवर कल्याणमधील आरटीओ अधिकाºयांनी गुरुवारी बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार चार वर्षांपूर्वीचे दरपत्रक आरटीओने रिक्षास्टॅण्डवर लावावे, चौथा प्रवासी घेऊ नये, असे निर्णय घेण्यात आले. ही भाडेवाढ प्रवासी स्वीकारतात का, हे बघावे लागणार आहे. प्रवाशांकडून नवीन दरानुसार भाडे मिळावे, यासाठी आरटीओ अधिकारी, वाहतूक नियंत्रण विभाग यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे रिक्षा संघटनांचे मत आहे.दरम्यान, पश्चिमेतील मार्गांवरील भाडेवाढीसंदर्भात आरटीओ अधिकारी तातडीने पाहणी दौरा करतील. यावेळी ते नागरिकांशीही चर्चा करतील. त्यानुसार, आवश्यक ते बदल केले जातील. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. दरवाढीसंदर्भात आणि रिक्षाचालकांच्या अन्य मागण्यांसंदर्भात एमएमआरटीएकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही ससाणे म्हणाले.दरम्यान, ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ‘रिक्षा प्रवास महागणार’ अशा आशयाचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाले होते, ते खरे ठरल्याची चर्चा प्रवासी संघटनांमध्ये सुरू आहे.लांबच्या प्रवासात भाडेवाढ१.५ किमीसाठी १८ रुपये भाडे आकारण्यात येते. पुढे प्रत्येक किमीला ते ११ रुपयांनी वाढत जाते. त्यानुसार, जवळच्या अंतरासाठी सध्या जे भाडे आकारले जाते, ते तेवढेच असेल. परंतु, लांबच्या प्रवासामध्ये दोन ते १० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवली