शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात फक्त १,२२,७२० लसींचाच साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता कहर लक्षात घेऊन लसीकरण करणाऱ्यांची एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता कहर लक्षात घेऊन लसीकरण करणाऱ्यांची एकच झुंबड उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारी फक्त एक लाख २२ हजार ७२० लसींचा साठा शिल्लक आहे. यापैकी जिल्ह्यात सर्व सहा महापालिकांकडे शुक्रवारपर्यंत पुरेल एवढीच लस शिल्लक आहे. तर ग्रामीणमध्ये तीन दिवसांच्या लसीकरणाचा साठा आहे.

जिल्ह्यात कोविशिल्ड लस पसंतीला उतरल्यामुळे ती घेण्याकडे नागरिकांचा सर्वाधिक कल आहे. त्यामुळे तिचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला. या तुलनेत कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे वास्तव दिसून आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात गुरुवारपर्यंत ६० लाख ९० हजार ४८० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पहिला डोस घेणारे असून काहींना दुसरा डोस दिलेला आहे. मात्र, जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि शनिवार, रविवार दोन दिवस पूर्ण संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या महामारीच्या चक्रव्युहातून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यातील १८२ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी झुंबड केली आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात लसींचा तुटवडा अधिक जाणवत आहे.

शहरी भागात शुक्रवारी पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. तर ग्रामीण भागातील गावपाड्यांना तीन दिवसांच्या लसींचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यास आवश्यक लसीचा साठा लवकरच पुरवठा करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. सध्या जिल्ह्याभरातील ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील २९ लाख ७० हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यासाठी ६१ लाख ८० हजार ३६६ लसींचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. या लसीकरणाचा पुरवठा जिल्ह्यात आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार उपलब्ध लसींच्या साठ्यातूनच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी लवकरच टप्प्याटप्प्याने लसींचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी लोकमतला सांगितले.

.........

कोट -

लसींचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आम्ही कोव्हॅक्सिन देऊ शकतो. त्यासाठी संबंधितांनी तत्काळ घुगे नावाच्या फार्मासिस्टला संपर्क करणे अपेक्षित आहे.

- गौरी राठोड, आरोग्य उपसंचालक, ठाणे

-------------------

१) जिल्हा- ठाणे

२) एकूण लसीकरण केंद्र- १८२ सुरू

३) एकूण लसीकरण - ६१,८०,३६६

४) शिल्लक डोस - १२२७२०

..........