शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘मेंटल’मधील स्टेशन मार्गी

By admin | Updated: May 10, 2016 01:56 IST

ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली.

ठाणे : ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या विस्तारित ठाणे स्टेशनबाबत नागरी संशोधन केंद्रात पार पडलेल्या बैठकीत स्टेशनच्या सीमांकनाबद्दल चर्चा झाली. हा प्रकल्प संयुक्त भागीदारीत पूर्ण करण्यावरही सहमती झाली. आठवडाभरात प्रकल्प अहवाल तयार करून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे. कोपरी पुलाजवळ रेल्वे मार्गावर एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येणाऱ्या पुलाबाबतही सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली. हे काम पावसाळ््यानंतर दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे. खासदार राजन विचारे यांनी गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घऊन या प्रकल्पासाठी वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याला समन्वयाचे काम देण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रभू यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता यांची नियुक्ती केली. विचारे यांनी तीन दिवस सातत्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रकल्पाविषयी चर्चा केली. त्या पाशर््वभूमीवर ही बैठक पार पडली.विस्तारित रेल्वे स्टेशनच्या सीमांकनाबाबत चर्चा झाली. ठाणे महापालिकेने या विस्तारित रेल्वे स्टेशनसाठी जे सीमांकन प्रस्तावित केले होते त्याला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून लवकरच हा प्रस्ताव रेल्वे बोर्डासमोर सादर करण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेच्यावतीने मे. बालाजी रेल रोड सिस्टम लि. ही सल्लागार संस्था करत आहे. तो आठवड्यात तयार करण्याची सूचना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या. अहवाल तयार झाल्यानंतर पुढील आठवड्यात सुरेश प्रभू यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल.या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल, नितीन पवार, उप अभियंता राजकुमार पवार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.