शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार, पालिका वादात छाया रुग्णालय  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:43 IST

अंबरनाथ नगरपालिकेचे बी.जी. छाया रुग्णालय हे राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे रुग्णालय ६ महिन्यांत हस्तांतरित करून घेतले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले होते.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेचे बी.जी. छाया रुग्णालय हे राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे रुग्णालय ६ महिन्यांत हस्तांतरित करून घेतले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, सरकारमार्फत हे रुग्णालय मुदतीत हस्तांतरित करून घेण्यात आले नाही. त्यामुळे आता पालिका प्रशासन आणि सरकार यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्याचा पहिला फटका रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाºयांना बसला आहे. ६ महिन्यांची मुदत संपल्याने येथील कर्मचाºयांना पालिका वेतन कशी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयाची झालेली दुरवस्था आणि या ठिकाणी रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे रुग्णालय राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय अंबरनाथ पालिकेने घेतला. त्यानुसार, सर्व प्रक्रियाही झाली. रुग्णालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया ६ महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट आदेश सरकारचे होते. त्यानुसार, मुदतीपूर्वीच हे काम होणे गरजेचे होते. मात्र, आजही ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. ही समस्या येथेच थांबलेली नाही. मूळ समस्येला आता सुरुवात झाली आहे. ६ महिन्यांपर्यंतची जबाबदारी ही अंबरनाथ पालिकेची होती. मात्र, आता ही मुदत जुलैमध्ये संपल्याने आॅगस्टपासून या रुग्णालयाच्या खर्चावर निर्बंध बसणार आहे. राज्य सरकारने ६ महिन्यांत हस्तांतरणाची प्रक्रिया न केल्याने आता त्यावर खर्च करणे, हा पालिकेला अडचणीचा विषय ठरला आहे. सर्वात आधी फटका येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांना बसला आहे.कर्मचाºयांच्या पगाराची जबाबदारी ६ महिन्यांनंतर सरकारची असल्याने पालिका त्यांना पगार कसा देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयाचे हस्तांतरण पूर्ण न झाल्याने पालिकेनेच हा पगार द्यावा, अशी मागणी डॉक्टर आणि कर्मचाºयांनी केली आहे. सरकार आणि पालिका यांच्यात ताळमेळ नसल्याने त्याचा फटका आम्ही का सहन करावा, असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत.रुग्णालय ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्याच्यावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी डॉक्टर आणि कर्मचाºयांना पगार हा पालिकेने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पगाराबाबत निर्णय न झाल्यास रुग्णालयातील कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.अत्यावश्यक सेवा असल्याने डॉक्टर आणि कर्मचाºयांचा पगार पालिकेने करणे गरजेचे आहे. रुग्णालय हस्तांतरणाचा विषय सरकारकडून लांबणीवर पडल्याने त्याचा भुर्दंड डॉक्टरांना देणे, हे चुकीचे आहे. येथील कर्मचारी हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना पालिकेने पगार दिला, तरी त्यात गैर काही नाही. यासंदर्भात मुख्याधिकाºयांशी चर्चा केली आहे. - प्रज्ञा बनसोडे, नगराध्यक्षासरकारच्या आदेशामुळे पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पगार देणे गैर नसले, तरी यासंदर्भात नगरविकास विभागाकडून अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल. हा विषय लवकरात लवकर सोडवण्यात येईल. वैद्यकीय सेवेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- डी.जी. पवार, मुख्याधिकारी