शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्टी दारु अड्डयांवर धाडसत्र: गावठी दारुसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: June 28, 2024 19:57 IST

भिवंडीच्या खाडीकिनारी एकाच ठिकाणी मिळाले ४०० ड्रम: अड्डा चालकांवर एमपीडीए अंतर्गत होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे आणि कोकाणी विभागीय भरारी पथकांनी ठाणे, भिवंडी परिसरातील खाडी किनारी असलेल्या हातभट्टीच्या दारु निर्मिती अड्डयांवर धाडसत्र राबवून गावठी दारुसह २९ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईमध्ये एकाच ठिकाणी दारु निर्मितीसाठी लागणाऱ्या रसायनाने भरलेले ४०० ड्रम मिळाल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी शुक्रवारी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या विविध भरारी पथकांसह उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथील विभागीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी २६ जून २०२४ रोजी हातभट्टीवरील दारुचे समूळ उच्चाट करण्यासाठी ही कारवाईची मोहीम राबविली. यामध्ये विभागीय आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी भिवंडीतील अलिमघर आणि अंजूरगाव या खाडीमधील एकाच ठिकाणी असलेल्या सहा हातभट्टी दारुनिर्मितीच्या ठिकाणी रसायनाने भरलेले सुमारे ४०० ड्रम भरलेले मिळाले. या कारवाईमध्ये सात गुन्हे दाखल केले असून ही हातभट्टी निर्मिती करणारी ठिकाणेही उध्वस्त केली. यावेळी हातभट्टीची २४५ लीटर गावठी दारु, गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे ७६ हजार २०० लीटर रसायन आणि इतर भट्टी साहित्य असा २९ लाख सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.तीन बोटींमधून उपायुक्तांची धाड-या कारवाईमध्ये कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी स्वत: तीन वेगवेगळया बोटींमधून जाऊन हातभट्टी केंद्रे उध्वस्त करण्याची मोहीम आपल्या पथकांसह राबविली. कारवाईची चाहूल लागताच दारुचे अड्डे चालविणारे माफीया पसार झाले असून त्यांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरु आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९, आयपीसी कलम ३२८ अन्वये तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचे आदेशही उपायुक्त पवार यांनी दिले आहेत. अशी कारवाई चालूच ठेवून हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणे समूळ नष्ट करणार असल्याचा दावाही त्यांनी व्यक्त केला आहे.