शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:25 IST

अंबरनाथकरांना दिलासा : सहा महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

अंबरनाथ : अंबरनाथ फलाट क्र.-१ आणि २ वर लोकल आल्यावर होणारी प्रवाशांची गर्दी तसेच रेल्वे पादचारी पुलावर चढताना होणारी दमछाक कमी करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून सुरू आहे. अंबरनाथमध्ये होम प्लॅटफॉर्मच्या प्रस्तावित कामाला रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. सहा महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जाणार आहे.

अंबरनाथ फलाट क्र.-१ आणि २ हे एकत्र असल्याने दोन्ही स्थानकांत लोकल आल्यावर येथे प्रवाशांची गर्दी होते. येथून बाहेर पडण्यासाठी कर्जत दिशेला एकमेव पूल असून तो पूलही अरुंद आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावर गर्दीचा सामना करावा लागत होता. येथे होम प्लॅटफॉर्मसाठी जागा उपलब्ध असतानाही रेल्वे प्रशासन येथे होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव पुढे करत नव्हते. मात्र, मुंबईतील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकारानंतर अंबरनाथच्या पुलावरही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याची जाणीव रेल्वे प्रशासनाला करून देण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी पर्यायी पुलासोबत होम प्लॅटफॉर्मचा प्रस्ताव सादर करण्यात आला. रेल्वे बोर्डाने अंबरनाथ स्थानकात होम प्लॅटफॉर्मला मंजुरी दिली होती. मात्र, ते काम निविदा प्रक्रियेत अडकले होते. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाने अंबरनाथमधील होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू केले आहे. पश्चिम भागातील स्वामीनगर भागाला लागूनच या प्लॅटफॉर्मचे काम सुरू करण्यात आले आहे. स्वामीनगरचा नाला ते आॅर्डनन्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या रेल्वेरुळांपर्यंत होम प्लॅटफॉर्मचे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या आरक्षण तिकीट खिडकीचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. या तिकीट खिडकीजवळ उभारण्यात आलेल्या एस्कलेटरलाही होम प्लॅटफॉर्मशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांना एस्कलेटरचा वापर करणे सोपे होणार आहे. तसेच स्थानकात उतरणाºया प्रवाशांना लागलीच रिक्षास्टॅण्डपर्यंत सहज पोहोचता येणार आहे.

आरक्षण केंद्रासाठी १६ वृक्ष तोडण्याची परवानगीच्अंबरनाथ येथील तिकीट आरक्षण केंद्र हे पश्चिम भागातून हलवण्यात येणार आहे. हे केंद्र पूर्व भागात येणार आहे.च्पूर्व भागात आरक्षण केंद्र उभारण्यासाठी रेल्वेच्या ताब्यातील जागेचा वापर करण्यात येणार आहे. पूर्व भागातील तिकीट खिडकीला लागूनच नवीन आरक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.च्त्यासाठी पालिकेकडे १६ वृक्ष तोडण्याची परवानगी मागितली आहे. ती मिळताच आरक्षण केंद्राचे काम सुरू होईल. होम प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल उभारून तो मुंबई दिशेला जोडण्यात येणार आहे. हे स्थानकाचे काम करत असताना पालिकेच्या शौचालयाचे योग्य प्रकारे नियोजन करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :localलोकल