शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून बुलेट ट्रेनसाठीच्या शेतजमिनीची मोजणीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:06 IST

मेट्रोपाठोपाठ आता बुलेट ट्रेनसाठी आवश्यक १९ हेक्टर शेतजमीन संपादन व मोजमापाच्या कामास सोमवार, ७ मे पासून प्रारंभ होत आहे. यामध्ये सुमारे २५० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. शेतकºयांचा प्रचंड विरोध असतानाही ठाणे तालुक्यातील सुमारे १९ गावांच्या शेतकºयांचे सुमारे १०४ प्लॉट या शेतजमिनीच्या संपादनासाठी जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या भूमी अभिलेख विभागाने यासाठी सर्व तयारी केली आहे.

- सुरेश लोखंडेठाणे  - मेट्रोपाठोपाठ आता बुलेट ट्रेनसाठी आवश्यक १९ हेक्टर शेतजमीन संपादन व मोजमापाच्या कामास सोमवार, ७ मे पासून प्रारंभ होत आहे. यामध्ये सुमारे २५० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. शेतकºयांचा प्रचंड विरोध असतानाही ठाणे तालुक्यातील सुमारे १९ गावांच्या शेतकºयांचे सुमारे १०४ प्लॉट या शेतजमिनीच्या संपादनासाठी जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या भूमी अभिलेख विभागाने यासाठी सर्व तयारी केली आहे.या शेतजमिनीच्या संपादनास आधीच विरोध करणाºया शेतकºयांमध्ये सर्वतोपरी जनजागृती करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. प्रतिसाद देत नसलेल्या शेतकºयांना लोकहिताच्या दृष्टीने बुलेट ट्रेनचे महत्त्व पटवून देण्यात आले. तरीदेखील या मोजमापाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क केली आहे. कमी वेळेत जास्तीतजास्त मोजमाप व्हावे, याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे केला जाणार आहे. ११ मे पर्यंत या पहिल्या टप्प्यातील शीळ, डावले, पडले, आगासन, बेतवडे, लहानी देसाई, मोठी देसाई आदी गावांच्या शेतकºयांच्या शेतजमिनी व सरकारी जमिनींचे मोजमाप करण्यात येणार आहे.जागतिक दर्जाच्या या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन देत असलेल्या शेतकºयांनी भरपाईच्या पॅकेजसह शेतकरी व त्यांच्या परिवाराचे पुनर्वसन आदींसाठी वेळोवेळी लक्ष वेधले आहे. बीकेसीतून ठाण्यात येणारी ही बुलेट ट्रेन ठाणे खाडीमार्गे कोपरखैरणे, महापे, शीळ असा वळसा घेऊन आागासन, म्हातार्डेमार्गे भिवंडीहून पालघर जिल्ह्यात जाणार आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान ताशी ३२० किमीच्या वेगाने धावणाºया बुलेट ट्रेनवरून राजकीय टीकेची झोड उठत आहे. अजूनही विरोधाची धार कमी झालेली नाही. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा देऊन ती अधिक तीव्र केली आहे. अशा परिस्थितीत भूसंपादनाच्या मोजणीला प्रांरभ होत आहे. केंद्र सरकारच्या या बुलेट ट्रेनसाठी ठाणे तालुक्यातील सुमारे १९ हेक्टर शेतजमिनीचा वापर होणार आहे. त्यासाठी शेतकºयांच्या खाजगी शेतजमिनीची खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याबाबत जागेची संयुक्त मोजणी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे तालुक्यातील नऊ गावांमधील १०४ प्लॉटवरील १९ हेक्टर जागा लागणार आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेऊन संयुक्त मोजणी तातडीने करण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाण्याच्या खाडीत ४० मीटर खोल बोगद्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे. ठाणे परिसरात येताना ती ठाणे खाडी, कोपरखैरणे, सावली, घणसोली, महापे, अडवली, भुतवली अशी शीळपर्यंत भुयारी मार्गाने धावणार आहे. शीळ येथून ती डावले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे, म्हातार्डी अशी एलिव्हेटेड (उड्डाण) मार्गाने जाणार आहे. यानंतर, ही बुलेट ट्रेन भिवंडी तालुक्यातील उसरघर, भारोडी, अंजूर, सारंग, सुरई, मानकोली, दापोडे, दिवे, अंजूर, केशळी, पुरने, काल्हेर, कोपर, केवानी, खारबाव, मालोडी, पायगाव, पोये, दिवे, वसई खाडी अशी पुढे पालघर जिल्ह्यात जाणार आहे.ठाणे जिल्ह्यातील मार्ग ३९.६६ किं.मीबुलेट ट्रेनसाठी मुंबई ते अहमदाबाद असा सुमारे ५०८.१० किलोमीटरचा मार्ग असून ठाणे जिल्ह्यातील मार्ग ३९.६६ किलोमीटर आहे. या मार्गाची रु ंदी १७.५ मीटर इतकीच राहणार असून बीकेसीपासून ठाणे तालुक्यातील शीळपर्यंत २१ किलोमीटरचा मार्ग भूमिगत असून त्यापुढे मात्र ४८७ किलोमीटर म्हणजे अहमदाबादपर्यंत ती एलिव्हेटेड- उड्डाणमार्गावरून जाईल. हा मार्ग जमिनीपासून १० ते १५ मीटर उंच असेल. दोन खांबांतील अंतरही ३० मीटर इतके असणार आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणे