शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करा - आमदार किणीकर

By सदानंद नाईक | Updated: April 28, 2023 17:49 IST

नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यास मध्यवर्ती रुग्णालयासह कामगार रुग्णलाय, महिला प्रसूतीगृह व महापालिका रुग्णालयातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडे केली. नर्सिंग कॉलेज सुरु झाल्यास मध्यवर्ती रुग्णालयासह कामगार रुग्णलाय, महिला प्रसूतीगृह व महापालिका रुग्णालयातील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय हे २०२ खाटाचे असून लवकरच रुग्णलाय ३५० खाटामध्ये वर्ग होणार आहे. रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, वांगणी, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी, रुग्णालय शेजारील मोकळ्या भूखंडावर मेडिकल कॉलेज व नर्सिंग कोर्स सुरू करण्याची मागणी जुनी आहे. दरम्यान आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी शासनाकडे लावून धरली असून त्यातील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला अंबरनाथ येथे मंजुरी मिळाली. तर नर्सिंग कॉलेजची मागणी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे लावून धरल्याने, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आमदार किणीकर त्यांनी व्यक्त केली.

 शहरात जिल्हास्तरीय मध्यवर्ती रुग्णालय, कामगार रुग्णालय, शासकीय महिला प्रस्तुतीगृह व महापालिकेचे २०० बेडचे रिजेन्सी अंटेलिया येथील मात्र गेल्या दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले रुग्णालय आहे. असे चार मोठे रुग्णालय शहरात असल्याने नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच भविष्यातील सुखसुविधेचा विचार करता अंबरनाथ येथे प्रस्तावित असलेले मेडिकल कॉलेज उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालय शेजारील मोकळ्या भूखंडावर सुरू करण्याच्या मागणीला जोर धरला आहे. मध्यवर्ती रुग्णालय शेजारी मेडिकलसह नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यास उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, वांगणी, मुरबाड, शहापूर आदी भागातील रुग्णांना व विद्यार्थाना लाभ मिळणार आहे. या भागातील नर्सिंग कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मध्यवर्ती रुग्णालयात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर