शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरात पुन्हा सुरु होणार स्टार ग्रेड अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:17 IST

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या स्टार ग्रेड अ‍ॅप तीन महिन्यापासून बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर

ठाणे : रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या स्टार ग्रेड अ‍ॅप तीन महिन्यापासून बंद असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी याबाबत पुढाकार घेऊन ते पुन्हा सुरु करण्यासाठी संबधींत विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार या अ‍ॅपचा डेमो सुरु झाला असून पुढील आठवड्यात तेपूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.या अ‍ॅपवर केवळ खडड््यांविषयीच नाही तर इतर विभागांच्यादेखील तक्रारी करता येणार आहेत. त्यामुळे आता खºया अर्थाने ते अपग्रेड होणार आहे.पावसाळ्यात शहरात किती खड्डे पडले, कोणत्या भागात पडले आणि ते बुजविण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली झाल्या, याबाबत पालिकेने मागील दोन वर्षापूर्वी स्टार ग्रेड नावाचे अ‍ॅप सुरु केले होते. याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. ते सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यावर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला होता. या तक्रारी तत्काळ संबधींत विभागाकडे दिल्या जात होत्या. तसेच याची कार्यवाई कोणत्या टप्प्यात आहे याची माहितीदेखील तक्रारदाराला दिली जात होती. त्यानंतर खड्डा बुजवल्यावरदेखील त्याचा फोटा अथवा माहितीचा मेसेज पाठविला जात होता. त्यामुळे शहरातील खडड््यांवर पालिकेने या अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रण आणल्याचे दिसून आले होते. या अ‍ॅपसाठी पालिकेने तब्बल ४५ लाखांचा खर्च केला होता.परंतु, यंदा मात्र शहरात खड्डे पडल्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी ठाणेकरांना पालिकेला फोन अथवा लेखी तक्रार करावी लागल्याचे दिसून आले. याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबधींत विभागाची बैठक घेऊन ते का बंद आहे, याची माहिती घेतली होती. त्यानंतर ते सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच हे अ‍ॅप सुरु करतांना त्यामध्ये केवळ खडड््यांविषयीच नाही तर पालिकेतील महत्त्वाच्या सर्व विभागांच्या तक्रारी त्यात करण्यासंदर्भातील सुचना केल्या होत्या. त्यानुसार संबधींत विभागाने आता या अ‍ॅपचा डेमो सुरु केला असून नागरिकांना सध्या खडड््यांविषयी तक्रारी करता येत आहेत. परंतु, पुढील आठवड्यात ते अपग्रेड होणार असून त्यात बहुतेक सर्व विभागांच्या तक्रारी ठाणेकरांना करता येणार आहेत.