शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीवरून साई अडचणीत

By admin | Updated: May 2, 2017 02:26 IST

पालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजप आघाडीतील साई पक्षाच्या वाटेला गेले आहे. मात्र त्या पक्षातील कांचन लुंड, कविता पंजाबी

उल्हासनगर : पालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजप आघाडीतील साई पक्षाच्या वाटेला गेले आहे. मात्र त्या पक्षातील कांचन लुंड, कविता पंजाबी, टोनी सिरवानी यांच्यात या पदासाठी जोरदार चुरस असून सभापतीपदावरून पक्षात उभी फूट पडण्याची भीती आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या लुंड यांना राज्यमंत्री चव्हाण यांनी पदाचा शब्द दिला असला, तरी पक्षप्रमुख जीवन इदनानी यांचा निर्णय अंतीम असेल. उल्हासनगर पालिका निवडणुकीत ओमी टीमच्या मदतीने एकहाती सत्ता स्थापनेचे भाजपाचे स्वप्न भंग पावले. अखेर साई पक्षासोबत समझोता करून आणि अनेकांची मर्जी सांभाळत महापौरपद भाजपकडे खेचून आणण्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यशस्वी झाले. त्यासाठी ओमी टीमला बाजुला सारून साई पक्षाला उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग व विशेष समिती सभापतीपदे द्यावी लागली. महापौर निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या साई पक्षातील लुंड गटाला स्थायी समिती सभापतीपदाचे आमिष राजमंत्र्यांनी दाखविले होते. तसेच साई पक्षाचे प्रमुख नाराज होवू नये, म्हणून इदनानी यांचा निर्णय अंतीम असे लुंड यांना सांगण्यात आले होते. पण ज्या पद्धतीने ईदनानी यांच्या मागण्या भाजपाने मान्य केल्या आहेत, ते पाहता लुंड यांचीच सरशी होईल, असे त्यांच्या गटात मानले जाते. भाजपचे वरिष्ठ नेते व माजी शहरजिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना पक्षाने तिकिट नाकारले. त्यांनी ऐन निवडणुकीत साई पक्षात प्रवेश घेऊन पत्नी कविता पंजाबी यांना रिंगणात उतरविले. कविता सर्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी कांचन लुंड यांच्याप्रमाणे स्थायी समिती सभापतीपदासाठी दावा केला आहे. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्या सर्वाधिक जवळचे असणारे नगरसेवक टोनी सिरवानी यांचे नावही पुढे आले आहे. सिरवानी, कविता तोरणे-रगडे, ज्योती भटीजा व गजानन शेळके एकाच प्रभागातून निवडून आले. सिरवानी यांच्या प्रभागातील चारही नगरसेवकांचा त्यांना पाठिंबा आहे. तसेच ते पक्ष प्रमुख जीवन इदनानी यांच्या ते विश्वासातील असून महापौर मीना आयलानी यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत. (प्रतिनिधी)डावपेच आणि विश्वासात स्पर्धासाई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्या जवळचे व विश्वासातील म्हणून टोनी सिरवानी आहेत, तर कविता पंजाबी राजकारणात नविन असल्यातरी त्यांचे पती लाल पंजाबी भाजपाचे माजी शहरजिल्हाध्यक्ष लाल पंजाबी यांना राजकारणाचे डावपेच चांगले माहित आहेत. २ ते ३ दिवसात स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीची तारिख जाहीर होईल आणि नव्याने घोडेबाजाराला सुरूवात होणार आहे. स्थायी समिती सभापतीपदाच्या शर्तीतून लुंड हळुहळू मागे पडत असून टोनी सिरवानी व कविता पंजाबी यांचे नाव समोर येत आहे.