शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : इमारतींचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : इमारतींचे स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतीला स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून हे प्रमाणपत्र घेऊन महापालिकेला सादर करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

उल्हासनगर महापालिका पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन नागरिकांना इमारती रिकामी करण्याचे आवाहन करते. तसेच इमारत पडून जीवित व वित्तहानी झाल्यास नागरिकांना जबाबदार धरले जाते. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत मोहिनी व साईशक्ती इमारतीचा स्लॅब पडून १२ जणांचा बळी गेला आहे. अखेर आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे की, धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून इमारतीची तपासणी करुन तसेच इमारतीची दुरुस्ती करत स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, ऐन कोरोना महामारीत कोणत्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्याकडून धोकादायक इमारतीची तपासणी करावी?. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेनेच एखाद्या मान्यताप्राप्त संरचनात्मक अभियंत्यांची नियुक्ती करुन धोकादायक इमारतीची तपासणी करावी. तसेच दुरुस्ती सुचवून स्थैर्यता प्रमाणपत्र महापालिकेला परस्पर सादर करण्याची मागणी होत आहे. धोकादायक इमारतीला वाढीव चटईक्षेत्र मंजूर करून त्यांची पुनर्बांधणी करावी. अशा मागणीने जोर धरला असून यातून हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका व राज्य सरकारने दुसरी घटना घडण्यापूर्वी ठोस निर्णय घेण्याची मागणीही होत आहे.

--------------------------------

सर्वेक्षणासाठी समिती स्थापन रेतीवर बंदी असताना शहरात १९९२ ते ९८ दरम्यान उलावा रेतीतून अनेक इमारतींचे बांधकाम झाले. त्याच दरम्यान बेकायदा इमारतींच्या तोडण्यात आलेल्या स्लॅबची दुरुस्ती करून घरांची विक्री झाली. अशाच इमारतीचे स्लॅब पडण्याच्या दुर्घटना होऊन अनेकांचे बळी जात आहेत. अखेर आयुक्तांनी अशा इमारतींचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रभाग समितीनुसार समिती स्थापन केली आहे.