शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कमिटी चार दिवस जिल्ह्यात

By admin | Updated: November 18, 2016 12:40 IST

विधिमंडळाची अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समिती गुरुवारपासून २० नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहे.

ठाणे : विधिमंडळाची अनुसूचित जमाती (एसटी) कल्याण समिती गुरुवारपासून २० नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा दौऱ्यावर आहे. १५ सदस्यांच्या या समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडील अनुसूचित जमाती प्रवर्गाशी संबंधित बाबींची तपासणी करून झाडाझडती घेणार आहे.पहिल्या दिवशी नियोजन भवन येथे प्रथम लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पोलीस अधीक्षक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे मनपा, मीरा-भार्इंदर मनपा यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर दुपारी जिल्हा परिषदेला भेट दिली. शहापूर येथील आश्रमशाळा, वसतिगृहे व इतर यंत्रणांच्या कामांना ही समिती १९ नोव्हेंबर रोजी भेट देणार आहे. २० नोव्हेंबर रोजी ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयात चार दिवसांच्या कामांच्या आढाव्यासंदर्भात चर्चा व मार्गदर्शन करणार आहे. या समितीमध्ये रूपेश म्हात्रे, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, नारायण कुचे, पास्कल धनागरे, प्रभुदास भिलावेकर, संजय पुराम, प्रा. चंद्रकांत सोनवणे, काशिराम पावरा, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, गोपीकिशन बाजोरिया, आनंद ठाकूर, निरंजन डावखरे, चंद्रकांत रघुवंशी आदी विधिमंडळ सदस्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)