शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

 कार्तिकी एकादशीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागातून जादा १३९ बसेस सोडणार

By जितेंद्र कालेकर | Updated: November 22, 2023 19:25 IST

आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही विठुरायाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या भक्तांना आस लागली आहे.

ठाणे : आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही विठुरायाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या भक्तांना आस लागली आहे. हीच बाब लक्षात घेत ठाणे विभागीय एसटी महामंडळाची लालपरीही त्यासाठी सज्ज झाली आहे. कार्तिकी एकादशीसाठी ठाणे जिल्ह्यातून जादा १३९ एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यानुसार २० नोव्हेंबरपासून काही बस पंढरपूरला रवानाही झाल्या आहेत.

लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पंढरपुरात दाखल होत असतात. येत्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोबिंवली, वाडा आणि शहापूर, येथून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान ठाणे जिल्ह्यातील विविध बस आगारांतून १३९ जादा बसचे नियोजन केले आहे. यामध्ये ७४ ग्रुप बुकिंग आणि १४ ऑनलाइन आरक्षण केलेल्या अशा ९१ बस रवाना होणार आहेत. या व्यतिरिक्त ऑनलाइन आरक्षणच्या ४८ बस सोडण्यात येणार आहेत. त्यातील अनेक बस २० नोव्हेंबरपासून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.२४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू होणार आहे. ठाणे आगार एक येथून दोन ग्रुप बुकिंग, ठाणे आगार दोन येथून ९ तर भिवंडीतून ४, शहापूर एक आणि विठ्ठलवाडी येथून ९ तसेच वाडा आगारातून सर्वाधिक ६५ जादा बस सोडल्या आहेत. या सोडलेल्या सर्व जादा गाड्यांचे आरक्षण एक महिना अगोदर या पद्धतीने उपलब्ध करू देण्यात आले होते. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बसस्थानकावर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सरकारी योजनांचा लाभयंदा राज्य शासनाकडून प्रवाशांकरिता ७५ वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजना या दोन सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ कार्तिकी यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांनाही होणार आहे. सोडण्यात आलेल्या बसआगार ग्रुप बुकिंग ऑनलाइन आरक्षण

  • वाडा ६५ - ००
  • ठाणे एक- ०२ - ००
  • ठाणे दोन- ०३- ०६
  • विठ्ठलवाडी ०४- ०५
  • भिवंडी ०१ -०३
  • शहापूर ०१- ००
टॅग्स :thaneठाणे