शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसचालकाचा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: May 1, 2017 05:54 IST

कल्याण एसटी बस डेपो व्यवस्थापनाने आकस ठेवून कारवाई केल्याच्या निषेधार्थ बसचालक महादेव म्हस्के यांनी १८ मे पासून

कल्याण : कल्याण एसटी बस डेपो व्यवस्थापनाने आकस ठेवून कारवाई केल्याच्या निषेधार्थ बसचालक महादेव म्हस्के यांनी १८ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कल्याण-पडघा मार्गावर एसटी महामंडळाची बस धावते. २०१२ मध्ये बसचालक ए. बी. वारे यांना प्रवाशांनी मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ म्हस्के यांच्या पुढाकाराने संप झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर आरोप ठेवून व्यवस्थापनाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले. या कारवाईविरोधात म्हस्के यांनी औद्योगिक कामगार न्यायालयात धाव घेतली होती. म्हस्के यांच्या बडतर्फीच्या कारवाईस न्यायालयाने ४ एप्रिल २०१७ ला स्थगिती दिली. हा आदेश घेऊन म्हस्के डेपोत आले असताना त्यादिवशी रामनवमीचे कारण सांगून डेपो व्यवस्थापनाने त्यांचा आदेश घेतला नाही. त्याचबरोबर त्यांची वाडा बस स्थानकात बदली केली. मात्र, बदलीच्या म्हस्के यांच्या वडिलांचा उल्लेख चुकीचा होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंढरीनाथ असून, आदेशात ‘पांडुरंग’ असा नामोल्लेख आहे. तसेच म्हस्के हे चालक असताना वाहक असे म्हटले आहे.म्हस्के हे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे डेपो व्यवस्थापनाने त्यांच्याविरोधात आकस ठेवून कारवाई केली आहे. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली असताना न्यायालयाचा आदेशही प्रशासनाकडून मानला जात नाही. त्यामुळे डेपोचे विभाग नियंत्रणक, डेपो व्यवस्थापक, स्थानकप्रमुख यांच्याविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी) अन्य संघटनांचाही पाठिंबाअन्य कामगार संघटनांनीही उपोषणाला पाठिंबा दिला आहे, असे म्हस्के यांनी सांगितले. तसेच म्हस्के यांच्यावरील अन्यायाविरोधात अन्य चालकही उपोषणाला बसणार आहेत.