शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एसटी बसला आग; वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला 

By अजित मांडके | Updated: January 3, 2023 10:43 IST

ठाण्यातून सुमारे ६५ प्रवासी घेऊन भिवंडीला निघालेल्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: ठाण्यातून सुमारे ६५ प्रवासी घेऊन भिवंडीला निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या (एसटी) बसला आग लागल्याची घटना ठाण्यातील उथळसर रोड येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास लागली. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

भिवंडी डेपोची बस मंगळवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास प्रवासी घेऊन ठाण्याकडून बस चालक आनंद विठोबा सवारे आणि वाहक अजित नामदेव कांबळे हे भिवंडीला निघाले होते. बस उथळसर प्रभाग समिती जवळ येताच बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. याचदरम्यान सावधगिरी बाळगून बस चालक आणि वाहक तसेच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 

त्यातच दुसरीकडे बसमधील प्रवाशांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या घटनेमुळे काही मिनिटे त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणे