शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अभ्यास दौ-यासाठी प्रायोजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:53 IST

महापालिकेचे सभाशास्त्र, अंदाजपत्रक, घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या विषयाचे प्रशिक्षण ठाण्यात घेणे शक्य नसल्याने महापालिकेचे नगरसेवक गुरुवारी राजस्थानच्या टूरला विमानाने रवाना होणार आहेत.

ठाणे : महापालिकेचे सभाशास्त्र, अंदाजपत्रक, घनकचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी या विषयाचे प्रशिक्षण ठाण्यात घेणे शक्य नसल्याने महापालिकेचे नगरसेवक गुरुवारी राजस्थानच्या टूरला विमानाने रवाना होणार आहेत. या टूरसाठी १२ लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षित धरला आहे. परंतु, विमानाची तिकीटे महागडी असल्याने त्यातील अर्धा खर्च एका प्रायोजकाने उचलल्याची माहिती समोर आली आहे. परंतु,हा प्रायोजक कोण हे मात्र समजू शकलेले नाही. दुसरीकडे काही नगरसेवकांनी दौºयासाठी लगीनघाई करून नवीन कपडे घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.चार दिवसांचे हे प्रशिक्षण असले तरी यानिमित्ताने नगरसेवकांची राजस्थानची सहल होणार असल्याची चर्चा शहरात आहे. नवनिर्वाचीत नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात येते. मात्र, सार्वत्रिक निवडणूक होऊन वर्ष उलटले तरी प्रशिक्षण झाले नव्हते. मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्यामार्फत ते आयोजित करण्यात येते. अखेर वर्षभरानंतर या संस्थेला महापालिकेतील नगरसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्र मासाठी मुहूर्त सापडला असून त्यांनी त्यासाठी राजस्थान येथील जयपूरची निवड केली आहे. त्यानुसार २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत हे प्रशिक्षण पार पडणार आहे. यासाठी महापालिकेने नगरसेवकांकरीता विमान प्रवास, निवास व्यवस्था, चहा-नाश्ता, दुपार आणि रात्रीचे जेवण अशी सोय केली आहे. त्यासाठी सुमारे १२ लाख रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये विमान तिकिट येऊन जाऊन साधारपणे ५ हजार आणि प्रत्येक दिवसाचे २ हजार असा खर्च धरला आहे. तीन दिवस वास्तव्य असल्याने साधारणपणे प्रत्येक नगरसेवकावर १२ हजारांचा खर्च होण्याची शक्यता आहे. असे असले तरी विमान प्रवासासाठी केवळ पाच हजार खर्च अपेक्षित धरला होता. त्यामुळे त्यावरील खर्चाची जबाबदारी आता एका प्रायोजकाने उचलली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने तर स्वत:ला कपडे घेण्याबरोबरच आपल्या गोटातील नगरसेवकांनादेखील नवीन कपडे घेण्यासाठी बुधवारी लगीनघाई चालविल्याचे दिसले.