शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

By admin | Updated: November 14, 2015 01:45 IST

अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्यातील स्पर्धकांनी आपला दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह ३६ पदकांची लयलूट केली.

ठाणे : अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्यातील स्पर्धकांनी आपला दबदबा निर्माण केला. या स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह ३६ पदकांची लयलूट केली. तर, ११ खेळाडूंची निवड शालेय राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात झाली आहे.अमरावती, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धा आयोजिली होती. १४, १७ आणि १९ वर्षांच्या गटात झालेल्या या स्पर्धेसाठी ठाणे, रायगडसह अन्य जिल्ह्यांतील सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले. १४ वर्षांआतील मुलींच्या गटात पूर्वा किरवे हिने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला आहे.तिने अनइव्हन बार या प्रकारात सुवर्ण तर बॅलन्सिंग बिममध्ये कांस्यपदकावर नाव कोरले. तसेच सोहम नाईक हिने टेबल व्हॉल्ट प्रकारात सुवर्ण, अनइव्हन बारमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अनन्या बापट हिला दोन सुवर्ण आणि एक रौप्य, ईरा आंग्रे हिने एक सुवर्ण व एक रौप्य तर ऋचा देवळे हिने एक सुवर्ण, संस्कृती पवार हिने एक सुवर्ण पटकाविले.तसेच याच मुलांच्या गटात श्रेयस मंडलिक याने एक सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या कामगिरीच्या जोरावर या सहा जणांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.१७ वर्षांआतील मुलींच्या गटात पल्लवी दाबक ही सर्वोत्कृ ष्ट खेळाडू आहे. तिने अनइव्हन बार या प्रकारात सुवर्ण आणि फ्लोअर एक्सरसाइज, बॅलन्सिंग बिम या प्रकारात रौप्यपदक मिळाले. तसेच साक्षी पिंपळे हिने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याच मुलांच्या वयोगटात कार्तिक पाडाळकर याने पॅरलल बार प्रकारात सुवर्ण, फ्लोअर एक्स आणि टेबल व्हॉल्ट या प्रकारात कांस्य मिळाले. तर, यश शिंदे याने हॉरिझंटल बार प्रकारात रौप्यपदक मिळविले. आदित्य फडणीस याने हॉरिझंटल बार प्रकारात सुवर्ण तर रिग्स् या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. (प्रतिनिधी)