शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट!

By जितेंद्र कालेकर | Updated: March 28, 2023 16:57 IST

वेळेआधी जन्म घेणाऱ्या व कमी वजनाच्या मुलांवर होणार तातडीने उपचार

ठाणे : महापालिकेच्या कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात चार स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ पेट्यांचे विशेष नवजात केअर युनिट (एनआयसीयू) उभारण्यास महापालिकेने मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे वेळेआधी जन्म घेणाऱ्या आणि कमी वजनाच्या मुलांवर तातडीने उपचार सुरू करता येणार आहेत. या प्रसूतिगृहात `एनआयसीयू'साठी भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता.

कोपरी येथील हे प्रसूतिगृह सुरू करण्यासाठी चव्हाण यांनी विधान परिषदेचे तत्कालीन उपसभापती कै. वसंत डावखरे यांना विनंती केली होती. त्यांच्या निर्देशानंतर महापालिकेने कोपरीत प्रसूतिगृह सुरू केले होते. मात्र, या ठिकाणी `एनआयसीयू' युनिट सुरू केले नव्हते. त्यामुळे वेळेआधी आणि कमी वजनाच्या मुलांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करावे लागत होते. तर काही गरीब पालकांना कर्ज काढून, नवजात मुलाला खासगी हॉस्पिटलमधील `एनआयसीयू' मध्ये दाखल करावे लागत होते.

काही वेळा पॅनलवरील डॉक्टर वेळेत न आल्यामुळे मुलांवरील उपचाराला अडचणी येत होत्या. या व्यथेबाबत चव्हाण यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात विशेष नवजात केअर युनिट (एनआयसीयू) उभारण्याची मागणी केली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, बांगर यांनी `एसएनसीयू'साठी अर्थसंकल्पात तरतूद केली. याठिकाणी चार स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीसह १८ पेट्यांचे `एनआयसीयू' युनिट उभारले जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. या निर्णयाबद्दल कोपरीतील महिलांनी आभार मानले आहेत. आई-बाळाची ताटातूट टळणार!लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतिगृहात मातेची प्रसूती झाल्यानंतर कमी वजन व आजारी नवजात बालकांना छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये हलविले जात होते. त्यावेळी माता कोपरीत, तर लेक कळव्याला अशी स्थिती निर्माण होत होती. अशा परिस्थितीत मातेच्या जीवाची घालमेल होत होती. तर नातेवाईकांची दोघांची काळजी घेताना धावपळ उडत होती. कोपरीत नव्या एनआयसीयू' युनिटमुळे आई बाळाची ताटातूट टळेल, याबद्दल भरत आणि ओमकार चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणे