शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणे जिल्हा झळकवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेद्वारे विशेष प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:29 IST

आगामी जिल्हा वार्षिक योजनेव्दारे जिल्ह्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

ठाणे : कृषी, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, शिक्षण, उर्जा, आरोग्य आदी विभागांच्या महत्वपूर्ण योजना आणि त्यासाठी उपलब्ध निधीच्या झाडाझडतीसह कोणताही निधी अखर्चित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी आणि आगामी जिल्हा आर्थिक विकास आराखडय़ाचे नियोजन आदींसाठी अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. त्यात वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणो जिल्हा झळकवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला.

येथील नियोजन सभागृहात यंदाच्या जिल्हा वार्षिक  योजनेतून झालेल्या विकास कामांसह 2क्22 -23 च्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी आराखडे अंतिम करून ते तातडीने देण्याचे आदेशही रानडे यानी या बैठकीत दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव अशी मदत केली जाते. त्याद्वारे ग्रामीण भागातील सुविधांचे बळकटीकरण,  नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या मुद्यांवर आजच्या बैठकीतजोरदार चर्चा झाली. लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्याचे मार्गदर्शही यावेळी करण्यात आले.

आगामी जिल्हा वार्षिक योजनेव्दारे जिल्ह्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांची भूमिका महत्वाची असल्याचे निदर्शनात आणून दिले. पुढील वर्षांपासून वन पर्यटनाच्या नकाशावर ठाणो जिल्ह्याचे नाव येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सहायक नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजनाच्या या बैठकीत विभागनिहाय योजना, अंदाजपत्रक, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता आदींच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विभागांना वर्ग केलेला निधी पुढील चार महिन्यात खर्च करण्यात यावा, त्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत परिपूर्ण मान्यतांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे देण्याच्या सूचना जाधव यांनी अधिका:यांना दिल्या. ग्रामीण भागातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे बळकटीकरण करून सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही जाधव यांनी दिली.