शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियम तोडणाऱ्यांविराेधात विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:50 IST

७० टक्के मनपा शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण : आयुक्तांची माहिती

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविडचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या. शहरात मास्क न वापरणाऱ्या तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात १० दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

नागरी संशोधन केंद्र येथे महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सुविधांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी असला तरी बाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये, तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना करतानाच रुग्णवाहिका, ऑक्सिजनपुरवठा, ऑक्सिजन बेड, ॲन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे, तसेच आवश्यक त्या औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांनी आरोग्य विभागास आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.

व्यापक जनजागृती करण्याची सूचनाठामपा शाळेतील ७० टक्के शिक्षकांच्या आरटी-पीसीआर चाचण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित चाचण्यातात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. येत्या काळात लसीकरण करण्यासाठी आरोग्यसेवकांची माहिती अद्ययावत ठेवण्याच्या सूचनादेखील त्यांनी आरोग्य विभागास केल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरूच ठेवून कोरोना संसर्गबद्दल नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

लसीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सर्व्हे ठाणे : कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने शहरातील सर्व वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा ७० टक्के सर्व्हे पूर्ण झाला असून पहिला लाभ त्यांना दिला जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. दुसरी लाट येणार की नाही हे सांगणे कठीण असले तरी, ठाण्यातील कमी हाेणारी रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी भान राखले तर ठाण्यात दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या