लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नोटाबंदीनंतर चार महिने रोख रकमेच्या चणचणीचा सामना करणाऱ्या नोकरदारांना गेल्या महिन्याप्रमाणे आताही पगार जमा होताच पुन्हा बंद एटीएमचा सामना करावा लागतो आहे. नो कॅशचे बोर्ड लावलेली एटीएम पुन्हा ग्राहकांना वाकुल्या दाखवून लागली आहेत. अर्थव्यवस्थेपेक्षा एटीएमच कॅशलेस झाली आहेत.केंद्रातील मोदी करकारने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या निर्दालनासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सोमवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही रोख गंगाजळीची परिस्थिती सुधारलेली नाही, हेच एटीएमच्या खडखडाटातून दिसून आले. गेल्या महिन्यातच सुट्टीचे नियोजन करून बाहेरगावी जाण्याच्या विचारात असलेल्यांना एटीएमबंदीचा फटका बसला होता. पैशांसाठी रांगा लागल्या होत्या. तशाच रांगा आता पुन्हा लावण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नोटांची चणचण पुन्हा का सुरू झाली, याचे कारण कोणालाच ठावूक नाही. सध्या सुट्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा स्थितीत रोख रकमेची मागणी एरव्हीपेक्षा घटली आहे, तरीही एटीएम यंत्रांत नोटांचा खडखडाट दिसून येतो. त्यामुळे आधी नोटाबंदीच्या काळात चार महिने आणि नंतर दरमहा नोटांच्या शोधात फिरणारे ग्राहक पुन्हा ठाणे, कल्याण, डोंबिवलीत दिसू लागले आहेत.कॅशलेस फसले अर्थव्यवस्था डिजिटल करण्याच्या घोषणेनंतरही या व्यवहारांबाबत सुरूवातीला असलेला उत्साह खूपच कमी झाला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे नियमितपणे होणारे व्यवहार त्याचप्रमाणात सुरू आहेत. काही प्रमाणात अॅपचा वापर वाढला आहे. पण व्यवहारांचे प्रमाण त्या तुलनेते वाढलेले नाही. विजेची, मोबाईलची बिले, हॉटेलचे बिल भरताना त्यावर शुल्क आकारले जात असल्याने पुन्हा रोख रकमा भरण्याकडे कल वाढला आहे.परराज्यांतून नोटांचा नाद सोडलागेल्या महिन्यात अनेक बँकांनी उत्तरेकडील राज्यांतील आपल्या शाखांतून पैसे मागवले होते. त्यामुळे ठाणे, डोंबिवलीतील बँकांनी आपले खास कर्मचारी नियुक्त करून तेथून पेट्या भरून रोख रकमा आणल्या. पण तो खर्चही आता पेलवेनासा झाला आहे. त्यामुळे बँंकांनी या महिन्यात तोही नाद सोडला आहे. २००० च्या नोटा कमीगेल्या महिन्याप्रमाणेच आताही दोन हजार रूपयांच्या नोटांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याऐवजी पाचशेच्या नोटा तुलनेने अधिक प्रमाणात आहेत. एटीएममधूनही गेल्या महिन्यात दोन हजारांच्या नोटा खूप कमी प्रमाणात मिळत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. नव्याने एटीएमचा शोधच्एटीएम कॅशलेस झाल्याने पुन्हा नोटांचा शोध घेत फिरणारे ग्राहक, कॅश असलेल्या एटीएमसमोर रांगा नव्याने दिसू लागल्या आहेत. च्रोख रकमेची ही चणचण ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा शहरांत मुरबाड-शहापूरसारख्या निमशहरी भागांतही जाणवते आहे. पण एटीएमसमोरील नो कॅशचे बोर्ड हटलेले नाहीत.
पगार होताच पुन्हा एटीएममध्ये खडखडाट
By admin | Updated: May 8, 2017 06:15 IST