शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरटे निघाले सोनसाखळी चोर; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:46 IST

चार गुन्ह्यांची कबुली : पाच तोळे दागिन्यांसह दुचाकी हस्तगत

ठाणे : दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेतलेल्या मीरा रोड येथील गार्फील्ड मेंनेझीस याने चौकशीत त्याच्या साथीदार रमेश हरी सिंग याच्यासह मोटारसायकल आणि सोनसाखळी चोरी अशा चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार दोघांना अटक करून त्यांच्याकडून ४ गुन्ह्यातील दोन दुचाकींसोबत ५ तोळ्याचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

काही दिवसांपासून कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले होते. ते गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना करून गस्त वाढण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार गस्तीदरम्यान संशयितांवर पाळत ठेवत असताना १४ मे रोजी गस्तीवर असलेल्या पथकाने संशयास्पदरित्या फिरणाºया दोघांना हटकले.

त्यातील एक जण पळून गेला तर दुसरा पळून जाताना त्याला पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा सापडला. तसेच मेंनेझीस (४४) याने साथीदार रमेश सिंग यांच्यासह मोटारसायकल आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याची क बुली दिल्यावर रमेशला बोरीवलीतून अटक केली. त्यांच्याकडून नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेली दुचाकी तसेच कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल असा लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.