शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे गटाचे आणखी काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

By अजित मांडके | Updated: July 6, 2023 19:00 IST

लवकरच स्फोट होईल, आमदार सरनाईक यांचा दावा

ठाणे :  शिंदे गटाचे आठ ते दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते. मात्र या केवळ वावड्या असून ठाकरे गटाचेच काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लवकरच स्फोट होईल असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. दुसरीकडे मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये संघर्ष झाला असल्याच्या बातम्या टीआरपी वाढवण्यासाठी पेरल्या जात असून सरकार चांगले काम करत असल्याने हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रावादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यातील समता नगर परिसरातील घरांच्या संदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्य्या सरकार मधील प्रवेशानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र यामध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघातील विकासकांमाच्या संदर्भात चर्चा केली असून कोणत्याच मतदार संघात निधी अभावी विकास कामे थांबणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली असून त्यामुळे आमदार नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाचेच आणखी काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा सरनाईक यांनी यावेळी केला. 

 मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यास सरनाईक यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा होत्या. मात्र मला मंत्रिपद मिळणार हे कोणत्या ज्योतिषाने सांगितले असा उलट प्रश्न सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना केला. दुसरीकडे सत्तेत वाटेकरी वाढले असले तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले अनेक वर्ष काम करत असून हे दोन्ही नेते शब्द पाळणारे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.