शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामस्थांनीच सुरू केली मृदासंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:09 IST

बेरोजगारीवर केली मात; शासनाने विलंब केल्याने शोधला पर्याय

- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोना महामारीच्या विळख्यात अधिकाधिक जखडले जाताना आर्थिक, बेरोजगारीचेही सावट गडद होत आहे. श्रमिकांसाठी प्रत्येक दिवस भूक, पैशाची चणचण आणि भविष्याची चिंता वाढवणारा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गमभागातील मजुरांनी १५ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे रोजगार मागणी केली. पण त्यास विलंब झाल्यामुळे मुरबाडच्या माळशेज घाट, डोंगर सपाटीच्या दहा गावांतील मजुरांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी वन जमिनीवर जल व मृदा संधारणाची, गाळ काढण्याची, नर्सरीची कामे या रखरखत्या उन्हात हाती घेऊन मजुरीच्या समस्येवर मात केली आहे.कोरोनाच्या संकटावर मात करीत असतानाच जागतिक वसुंधरा दिनाचा विसर पडू न देता मुरबाडच्या सामूहिक वनहक्कधारक गावांतील आदिवासी मजुरांनी सामाजिक अंतराचे नियम पाळून यंदा हा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.शासकीय यंत्रणेला कामे सुचिवण्यात विलंब झाल्याने ती सुरू करायला किती वेळ लागेल तोपर्यंत करायचे काय काय अशी चर्चा सुरू असताना या सामूहिक वनहक्क धारक गांवकऱ्यांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या पुढाकाराने जंगल, डोंगर, दºया-खोºयात जल व मृदा संधारणाची कामे, जूनमधील वनीकरणाच्या नर्सरी, तलाव, बंधारे गाळमुक्त करण्यासाठी साफसफाईची कामे हाती घेतली. तर शिसेवाडीच्या मजुरांनी घायपातीची नर्सरी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.आदिवासींनी आपल्या बेरोजगारीच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वत:च रोजगार निर्मितीचा निर्णय घेऊन कामाला सुरूवात केल्याच्या वृत्ताला श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी दुजोरा दिला.दहा गावांत सुरू झाली कामेयात मुरबाड तालुक्याच्या दुर्गम भागातील शिसेवाडी, दिवाणपाडा, केव्हारवाडी, पेजवाडी, शिरवाडी अशा १० गावांच्या मजुरांनी जल संवर्धनाच्या कामांसह सामूहिक वनीकरणासाठी खड्डे खणणे, गॅबियान बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे.जंगल वणवा प्रतिबंधक जाळरेषा हाती घेतल्या आहेत, डोंगरउतारावरील पावसाचे पाणी वाहून नेणाºया पाणचारीचे काम सुरू केले.जंगलाच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीची कामेही काही गावे करणार आहेत.शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत अनेक गावेपर्यावरण संवर्धन आराखड्यातील कामांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीने या कामांसाठी वनविभागामार्फत २०१९-२० मध्ये या निधीची तरतूद केलेली आहे. पण मार्च व अर्ध्या एप्रिल महिन्यात काम करता आलेच नाही. आता मात्र या गावांनी एकमताने निर्णय घेऊन वसुंधरा दिनाचे औचित्य साधून मृदा संधारणाची कामे, नर्सरी, गाळमुक्त बंधारे करण्यासाठी प्रारंभ केला आहे.यास अनुसरु न शासनाकडे शिरसोनवाडीतील १४ मजुरांनी शासनाकडे काम मागणी केली आहे. आणखी अनेक गावे प्रतीक्षेत आहेत. येणाºया हंगामासाठी बियाणे, खते, खावटी यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे.आगामी दीड महिन्यात जर रोजगार मिळाला नाही तर हा आदिवासी अल्प भूधारक शेतकरी व वन प्लॉट धारक पावसाळ्यात आपली शेती कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. पण त्यावर वेळीच मात करण्याच्या दृष्टीने काही गावांनी सुरू केलेली कामे हेच या प्रश्नाचे खरे उत्तर आहे, असे सूचक वक्तव्य ही अ‍ॅड. तुळपुळे यांनी केले आहे.