शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांनी वाचला गुन्ह्यांचा पाढा

By admin | Updated: June 27, 2017 03:11 IST

शहराचा मध्यवर्ती व उच्चभू लोकवस्तीच्या नौपाडा परिसरात विविध स्वरूपाच्या चोऱ्यांसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्या थांबवून

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहराचा मध्यवर्ती व उच्चभू लोकवस्तीच्या नौपाडा परिसरात विविध स्वरूपाच्या चोऱ्यांसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्या थांबवून सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाचा पाढा येथील सुमारे ५० सोसायट्यांमधील नागरिकांनी पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या बैठकीत वाचला. नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये ही बैठक डॉ. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला नौपाडा परिसरातील सुमारे ५० सोसायट्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून पोलिसांच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणाच्या मुद्यावर चर्चा केली. यावेळी पोलिसांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासह गुन्हे घडण्यास नागरिकांकडून कसे पोषक वातावरण तयार केले जाते, यावर डॉ. स्वामी यांनी उपस्थितांचे प्रबोधन केल्याचे ज्येष्ठ नागरिक व पोलीस मित्र महेंद्र मोने यांनी लोकमतला सांगितले. नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार ऐकून ‘ या बैठकीस हजेरी लावणारा प्रत्येक नागरिक हा आमच्यासाठी पोलीस असणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेण्यासाठी पोलिसांना सर्वतोपरी मदत करा’ अशी भावनिक सादही त्यांनी नौपाडाकरांना घातल्याचे मोने यांनी सांगितले. यावेळी नौपाडा ीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंद्रनगर या वसाहतीला लागून असलेल्या मैदानावर काही तरूण दारू पित असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. याशिवाय पोलीस स्टेशनजवळ असलेल्या गल्लीत बेशिस्तपणे वाहने लावली जातात, परिसरात गुन्ह्याचे व चोरीचे प्रमाण वाढल्याचे उदाहरणादाखल नागरिकांनी तक्रारी केल्या.यावर तोडगा सांगताना सोसाय्यांमध्ये असलेले वाचमन हे उत्तम दर्जाचे असावेत, पाच हजार रूपये वेतनाच्या वाचमनकडून सुरक्षेची हमी कशी घेता येईल, ठिकठिकाणी सोसायट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, सोसायट्यांनी एकत्र येऊन रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, यामुळे गुन्हेगारीला आळा बसून पोलिसांची जबाबदारी काही अंशी कमी होईल, असे मार्गदर्शन यावेळी उपस्थिताना झाले. यामार्गदर्शनानुसार कोहिनूर सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने दहा सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे या बैठकीत घोषीत करून तसे लेखी पत्रही पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या नावे दिले.