शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने दिला निराश्रिताला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:31 IST

पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोलीस आणि या सामाजिक कार्यकर्त्यामुळे एका संस्थेत आश्रय मिळाल्यामुळे गवारे यांच्या चेह-यावर हास्य फुलले.

- जितेंद्र कालेकरठाणे  - पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोलीस आणि या सामाजिक कार्यकर्त्यामुळे एका संस्थेत आश्रय मिळाल्यामुळे गवारे यांच्या चेहºयावर हास्य फुलले.पूर्व द्रुतगती मार्गावरील नौपाड्यातील ‘शनया’ हॉलच्या समोर गवारे यांनी अनेक दिवसांपासून उघड्यावरच निवारा शोधला होता. त्यांच्याकडे दयाकर यांनी विचारपूस केली, तेव्हा त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. मुले किंवा पत्नीही नसल्याचे त्यांनी सांगितले. दयाकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव यांना ही माहिती दिली. त्यानुसार, सहा. पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन सेंटर या पुनर्वसन केंद्राला या निराश्रित फिरस्त्याची माहिती देऊन त्याला या केंद्रात आश्रय देण्याची केंद्राच्या व्यवस्थापकांना ८ मे रोजी पत्राद्वारे विनंती केली. गवारे हे बेघर आणि बेवारस असल्यामुळे त्यांना संरक्षण आणि काळजीची गरज असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले. या पत्राची दखल घेऊन या केंद्राने गवारे यांना आपल्या पुनर्वसन केंद्रात आश्रय देण्याचे तत्काळ मान्य केले. त्यानुसार, ओऊळकर यांच्या पथकाने गवारे यांची रवानगी केली.‘‘गेल्या अनेक दिवसांपासून सेवारस्त्यावर हरिश्चंद्र गवारे या फिरस्त्याने उघड्यावरच आश्रय घेतला होता. आपल्याला कोणाचाच आश्रय नसल्यामुळे इच्छामरण मिळावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. दयाकर यांनी त्याची काळजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पदरमोड करून त्याला कर्जत येथील पुनर्वसन केंद्रात सोडवण्याची व्यवस्था केली.’’- चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या