शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

सामाजिक कार्ये कृतीतून दिसण्याची गरज : कवी अशोक बागवे यांचे ठाण्यात प्रतिपादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 4:22 PM

डॉ. शाहू रसाळ यांच्या ‘प्रेमात खरोखर जग जगते’ आणि ‘कविता: महात्मा गांधी आणि इतर दिवंगतांच्या नावे’ या दोन काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.

ठळक मुद्दे डॉ. शाहू रसाळ यांच्या काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे : कवी अशोक बागवेवंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात : डॉ. शाहू रसाळ

ठाणे  :  सामाजिक बांधीलकी मानूंन कार्य करणारे अनेक आहेत. पण या कार्यासाठी तन - मन - धन वेचुन कार्य करण्याची नितांत गरज आहे . प्रत्येकाच्या सामाजिक  कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे ," असे मत कवी अशोक बागवे यांनी ठाण्यात व्यक्त केले .

सहजीवन फाउंडेशन आणि शारदा प्रकाशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी डॉ . शाहू रसाळ यांच्या ' प्रेमात खरोखर जग जगते ," आणि महात्मा गांधी आणि इतर दिवगंताच्या नावे " या दोन काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते . यावेळी व्यासपीठावर नानजी खिमजी ठक्कर , कवयित्री मेघना साने  ,डॉ . शाहु रसाळ , कविता राजपूत , राजेन्द्र गायकवाड़ ई . मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कवी बागवे म्हणाले ", डॉ . शाहू रसाळ यांनी नेत्रतन्य डॉ . तात्याराव लहाने यांच्या पावलावर पाऊल ठेवलेले आहे. हजारो दृष्टिहिनाना दृष्टि मिळवुन दिलेली आहे  . वाढ़दिवसानिमित्त डॉ . शाहू रसाळ दरवर्षी मोफत ऑपरेशन करीत आहेत . गरजवंताला मदतीचा हात देणारे  डॉ. रसाळ  यांनी आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. डॉ . शाहू रसाळ यांनी केवळ सामाजिक आशयाच्या कविता लिहिल्या नाहीत तर सामाजिक कार्याचा मंत्र  आपल्या कृतीतून अंगीकारलेला आहे . यावेळी बोलताना डॉ . शाहू रसाळ म्हणाले ", माझे बालपण अत्यंत खड़तर गेले . मामानी माझे शिक्षण पूर्ण केले . त्यामुळे वंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात. प्रत्येकाने आपापल्या परिने सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवावा. "ठाण्यातील  हार्ट पेशंटसाठी अद्ययावत  रुग्णालय  उभारन्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगून नानजीभाई  खिमजी ठक्कर म्हणाले " , ठाण्यातील नागरिकाना  आजारपण्याच्या कोणत्याही उपचारसाठी मुलुंडची वेश ओलांडायची गरज नाही . अत्याधुनिक उपचार देणारे रुग्णालय ठाण्यात उभारले जाणार असून या रुग्णालयात हृदयरोग मोफत बरा केला जाणार आहे . डॉ. शाहू रसाळ यांच्यासारख्या सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या सेवाभावी माणसांमुळे हे स्वप्न पुर्णत्वला जाणार आहे . " खासदार राजन विचारे यांनीही डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . नानजी खिमजी ठक्कर यांना रूग्णमित्र पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . जुई प्रधान हिने काव्यसंग्रहातील काही निवडक कविता सादर करून उपस्तिथांची दाद मिळवली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले .' सहजीवन संगीत संध्या ' या  वाद्यवृंदातील अनेक गायक - गायिकानी विविध गाणी सादर करून  कार्यक्रमाची सुरूवात केली . डॉ. शाहु रसाळ आणि प्रीती निमकर यांनी अनेक द्वंद्वगीते सादर केली. सीकेपी हॉलमधे तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमासाठी अनेक रसिक ठाणेकर उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई