शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी रंगायतन येथील पार्किंग प्लाझाचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:48 IST

जीवन प्राधिकरणाची जागेस नकारघंटा : महापालिका अद्याप प्रतीक्षेत

ठाणे : स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या भागातील विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर वाहनतळ उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर झालेला आहे. परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अद्यापही येथील जागा हस्तांतरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे पालिका या जागेच्या प्रतीक्षेत आहे.

नव्या प्रस्तावात कार्यालय आणि निवासी स्थानासाठी इतरत्र जागा देण्याची तयारीही पालिकेने दाखविली आहे. प्राधिकरणाने प्रस्तावाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. स्टेशन परिसरात नित्याचीच वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ती फोडण्यासाठी आणि स्टेशनच्या  परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावदेवी मैदानाखाली भूमिगत पार्किंगचे काम सुरू केले आहे. तर गावदेवी मंडईच्या खालीदेखील पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

तसेच जांभळीनाका येथील महात्मा गांधी उद्यानाखालीदेखील भूमिगत पार्किंग प्रस्तावित केली आहे. याशिवाय गडकरी रंगायतन शेजारीदेखील आता पार्किंग प्लाझा उभारण्याचे निश्चित केले आहे. या वाहनतळामुळे मासुंदा तलाव, जांभळीनाका, टेंभीनाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा, असा दावा महापालिकेने केला आहे. 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर ३ डिसेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जागा हस्तांतरणासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला. मात्र, त्यास प्राधिकरणाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. यासंदर्भात भाजप आमदार संजय केळकर यांनी आयुक्त शर्मा यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शासन स्तरावर या प्रस्तावासंदर्भात बैठक आयोजित होईल, तेव्हा या बैठकीला आपणास पाचारण करण्यात येईल,असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती केळकर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे