शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मण्यारचा दंश झालेल्या आजीबार्इंना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:21 IST

मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.

ठाणे  - मण्यार सारख्या विषारी सर्पाने शहापुरातील ६२ वर्षीय आजीबार्इंना झोपेत दंश केला होता. त्याचे विष त्यांच्या अंगात भिनल्याने ह्रदयाचे ठोकेही हळूहळू कमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वास नलिका आणि औषधोपचार करून आजीबार्इंना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. आता आजीबार्इंची प्रकृती स्थिर आहे.अनुसया वरटे (६२) असे त्यांचे नाव असून त्या शहापूर तालुक्यातील हुताडी येथील रहिवासी आहेत. शेती हेच या कुटुंबाचे उदरनिर्वाह साधन असल्याने शेतावरच राहतात. घरात शिरलेल्या मण्यार या सर्पाने अनुसया यांना मध्यरात्री झोपेत दंश केला. कुटुंबाने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, विष पसरू लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्यांना १३ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांच्या ह्रदयाचे ठोके हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. नेताजी मुळीक यांच्या निदर्शनास आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील डॉक्टरांनी कृत्रिम श्वसन नलिका लावून औषधोपचार सुरू केले. रूग्णालयातील परीसेविकांच्या मेहनतीने आजींना जीवदान मिळाले.रुग्णालयात आणलेल्या आजींची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांचे वय जास्त असल्याने एकप्रकारची जोखीम होती. पण, औषधोपचारांना त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचे नशीब बलवत्तर असल्याने त्या बचावल्या.- डॉ. नेताजी मुळीक,वरिष्ठ फिजिशियन,जिल्हा सामान्य रूग्णालय, ठाणे

टॅग्स :Womenमहिलाnewsबातम्या