शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात धूम्रपान करणाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:50 IST

वागळे इस्टेट पोलिसांचा उपक्रम : पोलिसांसह नागरिकांनीही केले स्वागत

जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तंबाखू, गुटखा आणि मद्यसेवनामुळे आरोग्यावर व कामावर होणारा परिणाम लक्षात घेता, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या आवारात आणि पोलीस ठाण्यात पोलिसांसह सर्वांनाच धूम्रपानबंदी केली आहे. या परिसरात कोणीही धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर २०० रुपये दंडासह कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी दिली. सरकारी कार्यालयांत धूम्रपानावर बंदी असतेच. मात्र, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याची कसोशीने अंमलबजावणी सुरू झाली आहे.नळावरील भांडणांपासून ते सासूसासऱ्यांकडून होणारा विवाहितेचा छळ किंवा छेडछाडीच्या तक्रारी घेऊन महिलावर्ग मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात येतो. त्यांच्यासमवेत लहान मुलेही असतात. अशा वेळी पोलीस ठाण्यातील कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी जर धूम्रपान करीत असेल तर त्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होते. शिवाय, आलेल्या मुलांमध्येही चुकीचा संदेश जातो. कामावर आणि पोलिसांच्या आरोग्यावरही त्याचा घातक परिणाम होण्याची भीती असते. अनेक व्यसनाधीन पोलीस कर्मचारी हे निवृत्तीपूर्वीच अनेक व्याधींनी ग्रस्त असतात. अनेकांचा कर्करोग, हृदयविकाराने मृत्यू होतो. त्यामुळे पोलिसांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी कामावर तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात कोणीही धूम्रपान करू नये, असा आदेशाचा फलक पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावल्याचे पठाण यांनी सांगितले. अर्थात, हाच नियम पोलिसांप्रमाणे येणाºया तक्रारदार आणि आरोपींनाही लागू आहे. त्यामुळे आता पोलीस ठाण्यात येणारे फिर्यादी हे पोलीस ठाण्याच्या बाहेरच आपली तल्लफ भागवतात.पोलीस ठाण्याच्या बाहेरच ‘स्मोकिंग झोन’ केल्यामुळे काही तक्रारदार त्या भागाकडे जातात. पण, पोलीस ठाण्यात आणि आवारात धूम्रपानाला सक्त मनाई केल्यामुळे त्याचे चांगले परिणाम जाणवू लागल्याचे या पोलीस ठाण्यातील इतर पोलीस कर्मचारीही सांगतात. हाच कित्ता इतर पोलीस ठाण्यांनीही सुरू केल्यास पोलीस आणि फिर्यादी दोघांनाही त्याचा फायदाच होईल, असे मत व्यक्त होत आहे.पोलिसांच्या आरोग्यावर तसेच कामावर विपरित परिणाम होऊ नये तसेच तक्रारदारांनीही नशेच्या अमलाखाली येऊन कोणाची तक्रार करू नये, अशा अनेक उद्देशांनी हा नियम लागू करण्यात आला आहे. कडक अंमलबजावणीमुळे पोलीस ठाण्यात कोणीही धूम्रपान करीत नाही.-अफजल पठाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट, पोलीस ठाणे