शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हुक्क्याच्या धुराने तरुणाईला घातला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:17 IST

पोलिसांची कृपादृष्टी : कारवाई होत नसल्याने संताप, कुठे लपूनछपून तर कुठे खुलेआम धंदा सुरु

तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात अडकवण्याची सर्व सोय आजकाल बार, पबमध्ये खुलेआम आढळते. त्यात आता हुक्का पार्लरची संस्कृती रुजली असून तरुणांची पावले याकडे वळू लागली आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे बेकायदा पार्लर ठिकठिकाणी सुरु आहेत. गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण विभागाने अशा पार्लरवर छापा घातला. याच पार्श्वभूमीवर हुक्का पार्लरचे नेमके काय वास्तव आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.

तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात अडकवण्याची सर्व सोय आजकाल बार, पबमध्ये खुलेआम आढळते. त्यात आता हुक्का पार्लरची संस्कृती रुजली असून तरुणांची पावले याकडे वळू लागली आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे बेकायदा पार्लर ठिकठिकाणी सुरु आहेत. गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण विभागाने अशा पार्लरवर छापा घातला. याच पार्श्वभूमीवर हुक्का पार्लरचे नेमके काय वास्तव आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला हा आढावा.स्टेटस जपण्यासाठी नशाnसुरुवात हर्बल अर्थात नैसर्गिक हुक्का पार्लरने झाली. पुढे याच हर्बलमधून तंबाखूजन्य पदार्थांची तसेच निकोटीनची मागणी वाढल्यामुळे अनेक हुक्का पार्लरमधून निकोटीनचाही धूर यायला सुरुवात झाली.nअनेक ठिकाणी स्टेटस म्हणूनही या नशेचा वापर होऊ लागला. महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये क्रेझ निर्माण झालेली पार्लर महाविद्यालयांच्या आसपास किंवा शहराच्या आडोशालाही छुपकेछुपके सुरु झाली. nठाण्यातील घोडबंदर रोड, मुंब्रा, वागळे इस्टेट, उपवन, येऊर, कौसा, कोपरी आणि कापूरबावडी भागांमध्ये उच्चभ्रू आणि अगदी झोपडपट्टीतील वस्त्यांमध्येही या हुक्का पार्लरचा धूर निघतो.वयाचे बंधन नाहीतरुणांमध्ये या हुक्का पार्लरची क्रेझ असली तरी हुक्का ओढणाऱ्यांमध्ये वयाचे कोणतेही बंधन पाळले जात नसल्याचेही आढळते. अगदी १५ वर्षांपासून ते ६० वर्यांपर्यंतची मंडळी हुक्का पार्लरमध्ये व्यसनाच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळते.

गरीब-श्रीमंतीचाही भेद नाहीअनेकदा हुक्का पार्लरमध्ये उच्चभ्रू वस्तीतील मंडळी आढळून येत असली तरी अगदी गरीब घरातील मुलेही यात अडकलेली असल्याचे पाहायला मिळतात. प्रसंगी चोऱ्या, जबरी चोऱ्या करुनही या पार्लरमध्ये आपला शौक पुरा करण्यासाठी ही तरुणाई धजावत असल्याचे विदारक चित्र आहे.परवानगी नसल्यामुळे हर्बलचा देखावापानमसाला, गुलाबपाणी अशा ७० ते ८० प्रकारचे हुक्का पार्लर आहेत. मूळात निकोटीनयुक्त किंवा तंबाखूजन्य पदार्थ असलेल्या हुक्का पार्लरला राज्य सरकारने परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळेच पोलीस किंवा स्थानिक राजकीय नेत्यांशी आर्थिक हातमिळवणी करीत हर्बलचा देखावा करुन तंबाखूजन्य पदार्थांचे हुक्का पार्लर राजरोजसपणे सुरु असतात.

काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाज्याठिकाणी हर्बलचे हुक्का पार्लर आहेत, त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही सर्रास नियम पायदळी तुडविले जातात. हुक्का घेणाऱ्यांमधील अंतर, मास्क न लावणे इतरही कोरोनाशी निगडीत नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्यामुळे अशा हुक्का पार्लरची पोलिसांकडून वारंवार तपासणी करण्याचीही मागणी जोर धरु लागली आहे.