शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

खाजगी बिल्डरला दणका; ओपन लॅण्ड टॅक्स थकवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 02:07 IST

केडीएमसीने केल्या २२ सदनिका सील

कल्याण : कल्याण पश्चिमेतील ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील वडवली परिसरात निर्मल लाइफ स्टाइल या बिल्डरने ओपन लॅण्ड टॅक्सची थकबाकी न भरल्याने महापालिका प्रशासनाने गुरुवारी गृहसंकुलातील २२ सदनिका सील करून दणका दिला. या बिल्डरकडे ओपन लॅण्ड टॅक्सची १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. या कारवाईमुळे इतर बिल्डरांचेही धाबे दणाणले आहेत. त्यांच्याविरोधातही कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, धनादेश थांबवण्याच्या सूचना बिल्डरने बँकेला दिल्याने ते वटले नव्हते. त्यामुळे नोटीसही बजावण्यात आली आहे.

महापालिकेने थकबाकीदार निर्मल लाइफ स्टाइल या बिल्डरला प्रथम नोटीस पाठवली होती. त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने बिल्डरच्या मालमत्तेचा लिलाव २२ मार्चला ठेवला होता. त्यानंतर या बिल्डरने थकबाकीपैकी सहा कोटी ५० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. २२ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत त्याने सहा कोटी ५० लाखांचे धनादेश टप्प्याटप्प्याने महापालिकेला दिले. मात्र, धनादेशाचे पेमेंट थांबवण्यात आल्याने ते वटलेच नाहीत. करनिर्धारक व संचालक विनय कुलकर्णी यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या ही फसवणूक लक्षात आणून दिली. त्यानंतर बिल्डरला रोख भरण्यास सांगण्यात आले. त्याला दाद न मिळाल्याने बोडके यांनी कारवाईसाठी महापालिकेचे पथक पाठवले. या पथकाने कारवाई करत थकबाकीच्या रकमेइतक्या किमतीच्या २२ सदनिका सील केल्या. यावेळी प्रभाग अधिकारी सुधीर मोकल उपस्थित होते. तसेच धनादेश न वटल्याने बिल्डरला निगोशिएबल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅक्टच्या आधारे नोटीस बजावली आहे. ही नोटीस देऊ न पाच दिवस झाले असून १५ दिवसांत खुलासा करणे आवश्यक आहे. यावर समाधानकारक उत्तर न आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश बोडके यांनी कुलकर्णी यांना दिले आहेत.गतवर्षीच्या वसुलीत रक्कम जमामहापालिकेने मार्च २०१८ अखेर मालमत्ता, नगररचनाकर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ३७८ कोटी रुपये जमा केले होते. त्यामध्ये जप्त केलेल्या मालमत्तांची रक्कमही समाविष्ट केली होती. मालमत्ता जप्त केलेली रक्कम वगळता महापालिकेच्या तिजोरीत ६३२ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले होते. त्यात मालमत्ताकराची वसुली ३३८ कोटी ३३ लाख रुपये होती.३१ मार्चनंतरही महापालिकेची वसुली मोहीम थांबलेली नसून ती सुरूच आहे. ३१ मार्चपश्चातही १ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान महापालिकेने मालमत्ताकराच्या स्वरूपात तीन कोटींची वसुली केली आहे. त्यापाठोपाठ आज सील केलेल्या सदनिकांची रक्कमही मालमत्ताकराच्या वसुलीत धरली जाणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका