शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

ऊर्जाबचतीवर विद्यार्थ्यांचा स्मार्ट पर्याय

By admin | Updated: February 2, 2016 01:52 IST

थंडीच्या दिवसांत गरम पाण्यासाठी गिझरचा हमखास वापर केला जातो. मात्र, विसरभोळे लोक हा गिझर बंद करायला अनेकदा विसरतात

ठाणे : थंडीच्या दिवसांत गरम पाण्यासाठी गिझरचा हमखास वापर केला जातो. मात्र, विसरभोळे लोक हा गिझर बंद करायला अनेकदा विसरतात. त्याला सर्वाधिक ऊर्जा लागत असल्याने विजेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, ठाण्याच्या स्मार्ट विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचतीचा स्मार्ट उपाय शोधून काढला आहे. गिझरमुळे होणाऱ्या ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांनी ऊर्जाबचत करणारा एक साधासोपा असा दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा प्रकल्प तयार केला आहे. ऊर्जासमस्या हा एक गंभीर प्रश्न असून त्यादृष्टीने तिचा अपव्यय टाळण्यासाठी विविध उपाय सुचवले जात आहेत. याबद्दल जागरूक असलेल्या आर्य अशार (इयत्ता आठवी), अथर्व पाटील (इयत्ता पाचवी), स्पर्श खन्ना (इयत्ता सातवी), वेद सावंत (इयत्ता सहावी), अमोघ पटवर्धन (इयत्ता आठवी) या विद्यार्थ्यांनी मिळून एक अभिनव प्रकल्प तयार केला आहे. गिझर हे हाय पॉवर डिव्हाइस असून इतर डिव्हाइसपेक्षा त्याला जास्त ऊर्जा लागते. अनेकदा ते चालू राहिल्यामुळे वीज मोठ्या प्रमाणात वाया जाते. त्यामुळे आपल्या घरातच असलेल्या गिझरला ही सिस्टीम लावली तर बऱ्याच प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. या सिस्टीमला बंदचालू अशी दोन बटणे लावली आहेत. गिझरला शॉक लागण्याची अधिकशक्यता असल्याने या सिस्टीमला शॉकप्रूफ बटणे लावली असल्याचे चिल्ड्रन टेक सेंटरचे संचालक पुरुषोत्तम पाचपांडे यांनी सांगितले.गिझरमधून येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ सेट केली आहे. पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लो सेन्स बसविला आहे. सध्या या सिस्टीममध्ये १० मिनिटांची वेळ सेट केली आहे.