शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ५०० विद्यार्थिनी होणार स्मार्ट, महापालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:44 IST

महापालिका शाळेतील मुलींना दहावीनंतर शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने स्मार्ट गर्ल योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे : महापालिका शाळेतील मुलींना दहावीनंतर शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने स्मार्ट गर्ल योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका शाळेतील नववी व दहावीच्या तब्बल ५०० विद्यार्थिनींसाठी नव्या युगाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फोटोशॉप, ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन मल्टिमीडिया अ‍ॅनिमेशन यांचा समावेश असणार आहे.महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींमध्ये सक्षमता आधारित कौशल्य विकास समृद्ध करणे आवश्यक असून त्याद्वारे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांच्या पुढील शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक ठिकाणी होईल, हे पाहणे शिक्षण विभागाचे कर्तव्य आहे. त्यानुसार, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही स्मार्ट गर्लची योजना पुढे आणली आहे. यानुसार, महापालिकेच्या १६ माध्यमिक शाळांमधील नववी व दहावीमधील विद्यार्थिनींना सर्वार्थाने सक्षम बनवून स्पर्धात्मक युगात आपली स्मार्ट ओळख निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.१६ शाळांचा समावेश : या प्रकल्पामध्ये १६ शाळांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १० महिन्यांच्या कालावधीत (आठवड्यात दोन तास) असून ५०० विद्यार्थिनींचा त्यात समावेश असणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी ८० तासांचा असणार आहे. दरवर्षी ४० आठवडे हा अभ्यासक्रम सुरू राहणार आहे. या योजनेसाठी ८८ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित धरला असून तसा प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मंजुरीनंतर ही योजना प्रत्यक्षात अमलात येईल.\दहावीनंतर पुढे स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या शिक्षणाचे प्रमाणपत्रसुद्धादिले जाणार आहे. याचा नक्कीच भविष्यात या विद्यार्थिनींना फायदा होणार आहे.- विकास रेपाळे, अध्यक्ष, शिक्षण विभाग

टॅग्स :thaneठाणे