शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी योजना : अर्धवट प्रकल्पांना अखेर लागणार ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:59 IST

स्मार्ट सिटीच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत महापौर म्हस्के यांनी लाल-पिवळा रंग फुटपाथला दिला म्हणजे स्मार्ट सिटी होत नसल्याचे सांगून प्रशासनावर टीका केली होती.

ठाणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी काही अर्धवट आहेत, तर काही विविध स्वरूपांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही प्रकल्पांसाठी निधीची केवळ तरतूद केली असून त्यांची कामे मात्र सुरू झालेली नाहीत. यामुळे अशा प्रकल्पांचा निधी शहरातील इतर तातडीच्या आणि महत्त्वाच्या कामांसाठी वळता करावा, अशा सूूचना महापौर नरेश म्हस्के यांनी स्मार्ट सिटीच्या  बैठकीत दिल्या. त्या अनुषंगाने शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव यांनीदेखील त्यानुसार याचा अभ्यास करून स्मार्ट सिटीकडे पत्रव्यवहार करून हा निधी इतर कामांसाठी वळता करता येऊ शकतो का, याची माहिती पुढील बैठकीत द्यावी, असे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत.

स्मार्ट सिटीच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत महापौर म्हस्के यांनी लाल-पिवळा रंग फुटपाथला दिला म्हणजे स्मार्ट सिटी होत नसल्याचे सांगून प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर, शुक्रवारी झालेल्या बैठकीतदेखील त्यांनी पुन्हा याच मुद्याला हात घालून स्मार्ट सिटीत सुरू असलेल्या अनेक  प्रकल्पांची पुन्हा एकदा चिरफाड केली. सौरऊर्जा प्रकल्पाचा पालिकेला काय फायदा झाला, वॉटर फ्रंट प्रकल्पाची कामे अर्धवट स्थितीत आहेत, कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर आदींसह इतर प्रकल्पांची अवस्थाही जैसे थे अशीच आहे, फ्री वायफाय सुरू आहे का? पाण्याचे मीटर लावले, ते चांगले आहेत का?, त्यांची निगा देखभाल कोण करणार, त्यावर कंट्रोल कोणाचे आहे?, याची माहिती घेतली गेली का? असे अनेक सवाल करून त्यांनी पुन्हा आक्षेप नोंदविले. 

टॅग्स :thaneठाणेSmart Cityस्मार्ट सिटी