शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी ‘ग्लोबल इम्पॅक्ट’च्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:42 IST

दोन वर्षे ठाणे महापालिका चालविणार; पाच कोटी रुपयांचा खर्च

ठाणे : नवीन उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देणे व त्याद्वारे शहराच्या आर्थिक विकासास चालणे देणे हा ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनचा उद्देश आहे. ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ठाणे महापालिकेमार्फत शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारले आहे. त्याच्या माध्यमातून महापालिका शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे शहराचा एकूण आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे महापालिकेस रुस्तमजी गृहसंकुलात साकेत बाळकूम रस्त्यावर टाऊन सेंटर इमारत उपलब्ध झाली आहे. हे टाऊन सेंटर इमारत ग्लोबल इम्पॅक्ट हबसाठी टप्याटप्याने उपलब्ध करून देण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पाचा कालावधी हा ३० वर्षे इतका असणार आहे.महापालिकेस सध्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे एक लाख २० हजार चौरस फुट जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यापैकी ३० हजार चौरस फुट जागेत पुढील सुमारे सहा महिन्यात ग्लोबल हब कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्तावाला २८ फेब्रुवारी २०१८ च्या महासभेत मंजुरी मिळाली आहे.आता ग्लोबल इम्पॅक्ट हबची स्थापना करण्यासाठी कंपनी सचिव, विविध तज्ज्ञांची मते, कायदेशीर बाबी तपासणे आदी बाबी प्रस्तावित केल्या आहेत. त्यासाठी या हबची स्थापना लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे कंपनीची नियुक्ती होईपर्यंत पुढील दोन वर्षे हे हब चालविण्याचा विडा ठाणे महापालिकेने आपल्या खाद्यांवर उचलला आहे. त्याकरिता पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. त्यानुसार यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हबकरिता व्यावसायिक आराखडा तयार करणे प्रस्तावित केला असून हबची स्थापना तसेच दोन वर्षांच्या कालावधीत परिचलन करण्यासाठी कुशल व्यावसायिक-तांत्रिक मनुष्यबळ व सेवा पुरविणे आदी कामांचा समावेश केला आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेतील सूत्रांनी दिली.ग्लोबल इम्पॅक्ट हबची उद्दिष्टेठाण्यातील हे हब राज्यातील पहिले, तर देशातील दुसरे सर्वात मोठे स्टार्ट अप हब ठरणार आहे. ग्लोबल इम्पॅक्ट हबद्वारे विविध स्तरातील महिलांसाठी प्राधान्याने रोजगार निर्मिती व व्यवसाय चालू करण्यासाठी विशेष सुविधा देणे आदींचा यात समावेश असेल. या हबद्वारे पाच वर्षांत व त्यानंतर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शहरात कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यामार्फत संशोधन व विकास सुविधा विकसित करणे, शहरातील अस्तित्वातील उद्योगधंदे, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, लघु उद्योगांना चालणे देणे व त्यांच्या व्यवसायात वाढ करणे, नव्या स्टार्ट अपमुळे महापालिकेच्या उत्पन्नात अप्रत्यक्षपणे वाढ होणेदेखील अपेक्षित आहे.मिळणाऱ्या सेवाइनोव्हेशन - नवीन व्यवसाय संकल्पना तयार करणे यासाठी नागरिक, युवक, महिला यांना मार्गदर्शन. स्टार्टअप - नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन. इनक्युबेटर - व्यवसायात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. अ‍ॅक्सिलेटर - चालू केलेल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे. वर्क स्पेस - डेस्क स्पेस - नवीन उद्योजक, यांच्यासाठी कार्यालयाची जागा. हॅकेथॉन - नाविन्यपूर्ण स्फॉटवेअर तयार करणे आदींचा यात समावेश असणार आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीthaneठाणे