शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नवाढीत छोट्या विभागांचेही उड्डाण

By admin | Updated: April 11, 2016 01:27 IST

ठाणे महापालिकेने इतिहासात प्रथमच सर्वात जास्त वसुली करून प्रत्येक विभागाने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिकचे म्हणजेच तब्बल ५२६ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे

ठाणे : ठाणे महापालिकेने इतिहासात प्रथमच सर्वात जास्त वसुली करून प्रत्येक विभागाने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिकचे म्हणजेच तब्बल ५२६ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये दरवर्षी तोट्यात असलेल्या छोट्या २० विभागांनीदेखील यंदा अपेक्षेपेक्षा अधिकची कमाई करून एक नवे रेकॉर्ड केले आहे. या छोट्या विभागांनी यंदा ८.३९ कोटींचे अधिकचे उत्पन्न मिळवून एकूण ३९.७१ कोटींची वसुली केली. मागील दोन वर्षे पालिकेचे उत्पन्न जकात आणि एलबीटीच्या गर्तेत अडकले होते. कर्मचाऱ्यांचे पगार निघतील अथवा नाही, याबाबतही शंका उपस्थित झाल्या होत्या. परंतु, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेतील प्रत्येक विभागाला टार्गेट दिले. प्रत्येक विभागाच्या नियमित बैठका घेऊन वसुली न केल्यास कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार, पालिकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र त्यात ५२६ कोटींची वाढ करून पालिकेला यंदा १९०२.७५ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे उत्पन्नात मोठ्या विभागांनी बाजी मारली असली तरी छोट्या विभागांनीदेखील खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेच्या गडकरी रंगायतन आणि काशिनाथ घाणेकर या दोन नाट्यगृहांमधून यंदा २.७० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ते ३३ लाखांनी वाढले आहे. दादोजी क्र ीडा प्रेक्षागृहांचे उत्पन्नही ६९ लाखांवरून १.०८ कोटींवर गेले आहे. तजोरीतली छोट्या कामांमधील संकीर्ण जमासुद्धा १०.७ कोटींवरून १२.७१ कोटींवर गेली आहे. (प्रतिनिधी)