शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या ‘स्लाइड शो’ने डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 20, 2016 02:02 IST

सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाची ही भयानक परिस्थिती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची कथा स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली

ठाणे : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाची ही भयानक परिस्थिती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची कथा स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली. २०१३ सालच्या भीषण दुष्काळाच्या चित्रफितीने ठाणेकरांच्या डोळ्यांत पाणी आले. फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने २०१० पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा रविवारी ७५ वा शो पार पडला. या वेळी ‘पाणी दी स्टोरी आॅफ वॉटर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २०१३ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळग्रस्त भागांत जाऊन वरिष्ठ छायाचित्रकार संजय नाईक, प्रवीण देशपांडे यांनी दुष्काळाची भीषण दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. या वेळी भाजपाच्या अ‍ॅड. माधवी नाईकदेखील त्यांच्यासह होत्या. १० दिवसांत १० जिल्ह्यांचा प्रवास त्यांनी केला होता. सध्या महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ पाहता २०१३ सालचा दुष्काळाचा प्रवास स्लाइड शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. २० मिनिटांत चार वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाचे चित्रण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. या स्लाइड शोमधल्या एका प्रसंगाने थक्क झाले, तो प्रसंग होता बुलडाणा जिल्ह्यातील देऊळराजा या गावातला. २९ दिवसांनी एकदा पाणी येते, तेही एक तास. टँकरचे पाणी आले की महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक कशा प्रकारे धावतात, या प्रसंगाने हेलावून टाकले. जी २०१३ साली परिस्थिती होती, ती आजही महाराष्ट्रात आहे. शहरांमध्येही दुष्काळाची झळ पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणी वाचवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हेच या वरिष्ठ छायाचित्रकारांनी सांगितले. या वेळी त्यांनी या प्रवासादरम्यान आलेले अनुभवकथन केले. या वेळी अ‍ॅड. नाईक यादेखील उपस्थित होत्या. आजही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत जपून वापरवे व पाणी वाचवावे, असा संदेश त्यांनी दिला. काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतून सरकारने जी कामे केली, त्यातून परिस्थिती बदलली असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)