शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅबचा भाग कोसळून महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:34 IST

सुदैवाने या दुर्घटनेत मोठी हानी झाली नसली तरी, येथे वास्तव्य करणारी कुटुंबे या घटनेने धास्तावली असून त्यामुळे पोलिसांच्या जीर्ण वसाहतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य (शासकीय) रूग्णालयासमोरील जीर्णावस्थेत असलेल्या पोलीस लाईनमधील एका इमारतीमधील सागरे कुटूंबीय राहत असलेल्या घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळून वर्षा सागरे (३०) या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी हानी झाली नसली तरी, येथे वास्तव्य करणारी कुटुंबे या घटनेने धास्तावली असून त्यामुळे पोलिसांच्या जीर्ण वसाहतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डागडुजीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ टोलवाटोलवी सुरु असल्याचा आरोप आता उघड-उघड केला जात आहे.रुग्णालयानजीक असलेल्या पोलीस लाइनची वसाहत अतिशय जुनी असून, या वसाहतीतील अनेक इमारती धोकादायक बनल्या आहेत. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बी-३४ या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रमेश सागरे यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. त्यावेळी घरात असलेल्या वर्षा सागरे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मलमपट्टी केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. ही इमारत तळ अधिक चार मजली असून तेथे ७२ कुटुंबे वास्तव्य करतात.या घटनेची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापनाला समजल्यावर त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र,ही वसाहत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला.