शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्कायवॉकवर भिकाऱ्यांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:45 IST

स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसताना त्यात भिकाऱ्यांची भर पडल्याने पादचाऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.

डोंबिवली : येथील स्कायवॉकवर बिनधास्त फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे, आता त्यावर भिकाऱ्यांचाही वावर वाढला आहे. पूर्वेकडील भागात हे बकालतेचे चित्र सर्रास पाहयला मिळते. स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसताना त्यात भिकाऱ्यांची भर पडल्याने पादचाऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.सद्यस्थितीला महापौर विनिता राणे यांच्या आदेशानुसार स्थानक परिसरात काही प्रमाणात कारवाई होत असली तरी स्थानकाच्या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकवरील फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचा बिनधास्तपणे भरणारा बाजार अद्यापपर्यंत हटविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. प्रारंभी रात्री उशीरा हा बाजार भरायचा. पण आता दिवसाढवळयाही काही अंशी अतिक्रमण होऊ लागले आहे. सकाळी आणि सायंकाळी कामावर जाणारे आणि परतणारे चाकरमानी मोठया संख्येने या स्कायवॉकचा वापर करतात. त्यावेळी एकच गर्दी होते. त्यात फेरीवाल्यांचे अतिक्रमण पाहता त्याठिकाणाहून मार्गस्थ होणाºया पादचाºयाला अक्षरश: चालणेही कठीण होते. छोटी मोठी खेळणी विकणाºया एका कुटुंबाने तर या स्कायवॉकला आपले निवासस्थानच बनविले आहे. दोन्ही बाजूला फेरीवाले, भाजीपाला विक्रेते आणि वडापाव विक्रेत्यांचे अतिक्रमण होत असताना भिकाºयांचा वावर वाढला आहे.कल्याणच्या स्कायवॉकवर ज्याप्रमाणे भिकारी आणि गर्दुल्यांचा वावर असतो त्याप्रमाणे आता डोंबिवलीच्या स्कायवॉकवरही पूर्वेकडील बाजूसह डोंबिवली पश्चिमेला जोंधळे विद्यालयाकडे उतरणाºया पुलावरही भिकाºयांचा वावर आहे. तर मच्छीमार्केट परिसरात उतरणाºया पुलावर शेड नसल्याने त्या पुलावर मात्र फेरीवाल्यांचे अथवा भिकाºयांचे अतिक्रमण दिसत नाही परंतू वारांगनांचा संचार असतो.

टॅग्स :Beggerभिकारीdombivaliडोंबिवली