शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सहा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण मुंब्य्रात एकाच दिवशी पाच जणांना कोरोनाची लागण, कोरोना बाधीतांची संख्या झाली ३३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:14 IST

ठाण्यात आज एका दिवसात कोरोना बाधीतांची संख्या सहाने वाढली आहे. शहरातील कळवा आणि मुंब्रा भागात हे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : कोरोनाची संख्या आता ठाण्यात वाढतांना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात ठाण्यात नव्या सहा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा समावेश असून ती खारेगाव भागात वास्तव्यास आहे. तर मुंब्य्रातील काळसेकर हॉस्पीटलमधील एका कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य पाच जणांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही ३३ झाली आहे. तर कळव्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १२ तर मुंब्य्रातील कोरोना बाधीतांची संख्या ही ९ झाली आहे.             ठाण्यातील कळवा खारेगाव याठिकाणी वास्तव्यास असलेल्या सहा वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. या मुलीच्या घरी कोल्हापूर येथून १५ वर्षीय मुलगी आली होती. सदर १५ वर्षीय मुलगी ही कोल्हापुर येथे एका महिलेच्या अंत्ययात्रेसाठी गेली होती. जी मयत महिला होती, तिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ती ठाणे खारेगाव या भागात आपल्या नातेवार्इंकाकडे आली होती. जेव्हा ती आली, तेव्हांपासून सदर १५ वर्षीय मुलीला घरातच क्वॉरन्टाइन करण्यात आले होते. परंतु तिचा रिपोर्ट हा निगेटीव्ह आला आहे. दुसरीकडे काळजी म्हणून त्या घरातील सहा वर्षीय मुलीची तपासणी केली असता, तिचा रिपोर्ट मात्र पॉझीटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्यावर होराईझन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिची आई, वडील, काका आणि आजी यांना देखील पालिकेने घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. तर कळव्यातील एका खाजगी रुग्णालयात गेलेल्या व्यक्तीची रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर आता त्याच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कळव्यातील रुग्णांची संख्या आता १२ वर पोहचली आहे.             दुसरीकडे बुधवारी मुंब्य्रातील काळसेकर रुग्णालयात कामाला असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर पाच जणांना पालिकेने क्वॉरन्टाइन केले होते. गुरुवारी त्यांची चाचणी केली असता, ती पॉझीटीव्ह आली आहे. त्यामुळे आता मुंब्य्रात एकाच दिवशी पाच नव्या रुग्णांची भर पडली असून येथील रुग्णांची संख्या आता थेट ९ वर गेली आहे. तर ठाण्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२ वर गेली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या