शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एका रिक्षासह सहा वाहनांना आग : रविवारी पहाटेची घटना

By admin | Updated: July 16, 2017 20:57 IST

ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला

आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 16 - ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्ररकणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातील गवते चाळीत राहणाऱ्या योगिता भांगरे (३५) यांची रिक्षा आणि एका दुचाकीला आग लागल्याचे रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर आणखी चार दुचाकींनाही आग लागल्याचे समजले. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून ती कोणी आणि का लावली याचाही तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. रविवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर हे अधिक तपास करीत आहेत. महिनाभरात दुसरी घटनाएक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथेही दुचाकी आणि रिक्षांना आगी लावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस अजूनही तपास करीत आहेत. त्याच भागात काही दिवसांपूर्वीही वाहनांना आगी लावण्याचे प्रकार घडले होते. तर सहा महिन्यांपूर्वी ठाण्याच्या सॅटीस परिसरातही दुचाकींना आगी लावल्या होत्या. त्यामध्ये मात्र, एकाला अटक केली होती. पुन्हा सिद्धेश्वर तलाव परिसरातही हाच प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. उपायुक्तांनी घेतली बैठकएका महिला रिक्षा चालकाची रिक्षा आणि दुचाकी जाळल्याप्रकरणाची ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी गंभीर दखल घेतली. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला. सायंकाळी सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी आरोपींना शोधण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. $$्रि