शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एका रिक्षासह सहा वाहनांना आग

By admin | Updated: July 17, 2017 01:13 IST

ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातील गवते चाळीत राहणाऱ्या योगिता भांगरे (३५) यांची रिक्षा आणि एका दुचाकीला आग लागल्याचे रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर आणखी चार दुचाक्यांनाही आग लागल्याचे समजले. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून ती कोणी आणि का लावली, याचाही तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. रविवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर अधिक तपास करीत आहेत.लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह सहा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरातील गवते चाळीत राहणाऱ्या योगिता भांगरे (३५) यांची रिक्षा आणि एका दुचाकीला आग लागल्याचे रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर आणखी चार दुचाक्यांनाही आग लागल्याचे समजले. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून ती कोणी आणि का लावली, याचाही तपास सुरू असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. रविवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर अधिक तपास करीत आहेत.महिनाभरात दुसरी घटनाएक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-३ येथेही दुचाकी आणि रिक्षांना आगी लावण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस अजूनही तपास करीत आहेत. त्याच भागात काही दिवसांपूर्वीही वाहनांना आगी लावण्याचे प्रकार घडले होते. सहा महिन्यांपूर्वी ठाण्याच्या सॅटीस परिसरातही दुचाकयांना आग लावली होती.उपायुक्तांनी घेतली बैठकमहिला रिक्षा चालकाची रिक्षा आणि दुचाकी जाळल्याप्रकरणाची ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी गंभीर दखल घेतली. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तातडीने नौपाडा पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी आरोपींना शोधण्याचे आदेश दिले.